कोहली वन-डे रँकिंगमध्ये दुस-या स्थानी कायम

By Admin | Updated: September 5, 2016 22:29 IST2016-09-05T22:29:22+5:302016-09-05T22:29:22+5:30

आयसीसी वन-डे क्रमवारीत फलंदाजांमध्ये भारतीय फलंदाज विराट कोहलीने दुसरे स्थान कायम राखले आहे.

Kohli retains second place in ODI ranking | कोहली वन-डे रँकिंगमध्ये दुस-या स्थानी कायम

कोहली वन-डे रँकिंगमध्ये दुस-या स्थानी कायम

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
दुबई, दि. ५ -  आयसीसी वन-डे क्रमवारीत फलंदाजांमध्ये भारतीय फलंदाज विराट कोहलीने दुसरे स्थान कायम राखले आहे तर रोहित शर्माची एका स्थानाने घसरण झाली असून तो सातव्या स्थानी आहे. सोमवारी ही क्रमवारी जाहीर झाली. सलामीवीर शिखर धवन आठव्या स्थानी कायम आहे.
 
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणारा इंग्लंडचा फलंदाज जो रुट प्रथमच अव्वल पाचमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. रुटने या मालिकेत २७४ धावा फटकावल्या. त्याने न्यूझीलंडचे केन विलियम्सन व मार्टिन गुप्तील यांच्यासह भारतीय फलंदाज रोहित शर्माला पिछाडीवर सोडले असून तो चौथ्या स्थानी आहे. 
 
रुट व्यतिरिक्त इंग्लंडच्या चार फलंदाजांनी क्रमवारीतील स्थानात सुधारणा केली आहे. अ‍ॅलेक्स हेल्सने चार स्थानांची प्रगती केली असून तो २० व्या स्थानी आहे. 
 

Web Title: Kohli retains second place in ODI ranking