कोहली दहाव्या स्थानावर कायम

By Admin | Updated: May 28, 2015 01:31 IST2015-05-28T01:31:16+5:302015-05-28T01:31:16+5:30

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली पूर्वीप्रमाणेच दहाव्या स्थानावर कायम आहे.

Kohli retained the number 10 position | कोहली दहाव्या स्थानावर कायम

कोहली दहाव्या स्थानावर कायम

दुबई : इंग्लंडच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर १२४ धावांनी मिळवलेल्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या बेन स्टोक्सने आयसीसी टेस्ट प्लेअर रँकिंगमध्ये तिन्ही गटांत उत्तुंग झेप घेतली आहे, तर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली पूर्वीप्रमाणेच दहाव्या स्थानावर कायम आहे.
स्टोक्सने ९२ आणि १0१ धावांची लाजवाब खेळी केली. याशिवाय त्याने अखेर ३८ धावांत ३ गडीही बाद केले. त्यामुळे तो फक्त सामनावीरच ठरला नाही तर त्याला रँकिंगमध्येही लाभ झाला.
२३ वर्षीय स्टोक्सने फलंदाजी क्रमवारीत २७ क्रमांकांनी झेप घेतली असून, तो ४४व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या यादीत त्याने ४ क्रमांकांनी झेप घेतली असून, तो ५१ व्या, तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने १२ क्रमांकांनी झेप घेतली असून, तो आता १३व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडसाठी आणखी एक चांगली बाब म्हणजे त्यांचा उपकर्णधार जो रूट, हा प्रथमच अव्वल पाच फलंदाजांत पोहोचण्यात यशस्वी ठरला. रूटने ९८ आणि ८४ धावांची खेळी केली आणि त्याने ३ क्रमांकांनी झेप घेतली असून, तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तो आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथपेक्षा फक्त एका गुणाने मागे आहे. इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुकदेखील आपल्या १६२ धावांच्या खेळीमुळे अव्वल २0मध्ये पोहोचला आहे. त्याने ६ क्रमांकांनी प्रगती केली असून, तो १८व्या स्थानी पोहोचला आहे. अन्य फलंदाजांत जोस बटलरने ९ आणि मोईन अलीने १३ स्थानांनी प्रगती करीत अनुक्रमे ५६ आणि ७८व्या स्थानी पोहोचले आहेत.
न्यूझीलंडचा केन विलियम्सन पूर्वीप्रमाणेच सहाव्या स्थानावर कायम आहे; परंतु त्याच्या रेटिंग गुणांची संख्या वाढून ८६0 झाली आहे. बीजे वॉटलिंग ३५व्या आणि कोरी अँडरसन ७६व्या स्थानी आहेत.
गोलंदाजांच्या यादीत एकही भारतीय गोलंदाज टॉप टेनमध्ये नाही. रवीचंद्रन आश्विन १३व्या स्थानावर आहे. अशा प्रकारे तो भारताचा नंबर वन गोलंदाज कायम आहे. आश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी कायम आहे. या यादीत त्याच्या पुढे बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि दक्षिण आफ्रिकेचा वर्नोन फिलेंडर आहे. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग प्राप्त केले आहे. तो रंगना हेराथ आणि मिशेल जॉन्सनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. डेल स्टेन अद्यापही गोलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. त्यानंतर जेम्स अँडरसन आणि रेयान हॅरिस यांचा क्रमांक लागतो.
दरम्यान, इंग्लंडने २९ मेपासून हेंडिग्ले येथे सुरू होणारा दुसरा कसोटी सामना जिंकला अथवा तो ड्रॉ ठेवल्यास न्यूझीलंडची चार क्रमांकांनी घसरण होऊन तो सातव्या क्रमांकावर पोहोचेल आणि त्यांच्या जागी इंग्लंड तिसऱ्या स्थानावर येईल. तथापि, न्यूझीलंडने सामना जिंकल्यास तो चौथ्या स्थानी घसरेल आणि भारत तिसऱ्या स्थानावर स्थानापन्न होईल. सध्या भारत आणि न्यूझीलंडचे ९९
असे समान गुण आहेत; परंतु
किवी संघ दशांश गणनेनुसार पुढे आहे. (वृत्तसंस्था)

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोहली टॉप टेनमध्ये असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्यानंतर मुरली विजय (२४), चेतेश्वर पुजारा (२५) आणि अजिंक्य रहाणे (२६) यांचा क्रमांक लागतो.

Web Title: Kohli retained the number 10 position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.