कोहली टी-२०मध्ये नंबर वन

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:19+5:302015-09-01T21:38:19+5:30

टी-२० मानांकनात अव्वल : विराटचा दुहेरी आनंदाचा क्षण

Kohli one-one in T20 | कोहली टी-२०मध्ये नंबर वन

कोहली टी-२०मध्ये नंबर वन

-२० मानांकनात अव्वल : विराटचा दुहेरी आनंदाचा क्षण
दुबई : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली
याच्यासाठी आजचा दिवस दुहेरी आनंद देणारा ठरला.
त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २२ वर्षांनंतर
श्रीलंकेच्या भूमीवर विजय पताका फडकाविल्या. तसेच,
विराटने आयसीसीच्या ताज्या मानांकन यादीत टी-२०
रॅँकिंगमध्ये टॉपचा फलंदाज होण्याचा मान मिळवला.
सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आयसीसी
मानांकनानुसार, विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन फलंदाज
ॲरोन फिंचच्या जागी स्थान पक्के केले. फिंच हा
सोमवारी सामना खेळू शकला नव्हता. ज्यामुळे त्याला १७
गुणांचे नुकसान सहन करावे लागले. या संधीचा फायदा
कोहलीला मिळाला. कोहली आता फिंचपेक्षा ७ गुणांनी
आघाडीवर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली
दुसर्‍या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गन
आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथसुद्धा पुढे जाण्यास अपयशी
ठरले आहेत. मॉर्गनने ७४ धावा केल्या होत्या, तरीही
तो सहा स्थानांनी पिछाडीवर गेला. तो आता आठव्या
स्थानी आहे. दरम्यान, पराभवामुळे ऑस्ट्रेलिया संघ एका
स्थानाने पिछाडीवर गेला असून, ते आता तिसर्‍या स्थानावर
आहेत. श्रीलंका संघ अजूनही अव्वल क्रमांकावर आहे,
त्यानंतर पाकिस्तान संघाचा नंबर लागतो.

Web Title: Kohli one-one in T20