द्रोणाचार्य पुरस्कारासाठी दुर्लक्षित केल्याने ज्ञान नाराज

By Admin | Updated: August 16, 2014 22:24 IST2014-08-16T22:24:51+5:302014-08-16T22:24:51+5:30

पंतप्रधान व क्रीडामंत्र्यांना करणार विनंती

Knowledge displeases because of ignoring the Dronacharya Award | द्रोणाचार्य पुरस्कारासाठी दुर्लक्षित केल्याने ज्ञान नाराज

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी दुर्लक्षित केल्याने ज्ञान नाराज

तप्रधान व क्रीडामंत्र्यांना करणार विनंती
नवी दिल्ली : ऑलिम्पियन आणि ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित पहिलवान ज्ञानसिंह यांनी प्रशिक्षकपदासाठी दिल्या जाणार्‍या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी या वेळेस दुर्लक्षित केल्याने विरोध व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे ते आपल्या हक्कासाठी समितीची चौकशी करण्याची विनंती केली आहे.
हॉकी संघाचा माजी कर्णधार अजितपाल यांच्या नेतृत्वाखालील द्रोणाचार्य समितीने या वर्षी ५ प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली होती. रेल्वेत क्रीडाधिकारी पदावर कार्यरत ज्ञानसिंह यांनी द्रोणाचार्य पुरस्कारासाठी आपला दावा केला होता; परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. समितीच्या या निर्णयावर ज्ञानसिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना पंतप्रधान आणि क्रीडामंत्री यांना पत्र लिहून याप्रकरणीची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे.
या वर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी एकाही खेळाडूचे नाव घोषित न होण्याविषयी तसेच अर्जुन पुरस्कारासाठी वाद सुरू आहे. हॉकी इंडियाने आपल्या सात खेळाडूंपैकी एकाची अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्याबद्दल आणि भारतीय बिलियडर्स व स्नूकर महासंघानेही त्यांच्या तीन खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी दुर्लक्ष केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अर्जुन पुरस्कारानंतर आता द्रोणाचार्य पुरस्कारदेखील वादाच्या भोवर्‍यात अडकताना दिसत आहे. गत २० वर्षांपासून ग्रीको रोमन आणि फ्री स्टाईल प्रशिक्षक ज्ञानसिंग यांनी याविषयी पंतप्रधान आणि क्रीडामंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी कोणत्याआधारावर या पुरस्कारासाठी निवड केली आहे आणि या प्रकरणाविषयी आपण चौकशी करण्याचा तुम्हा आग्रह करीत आहोत. क्रीडामंत्रालयाने या पुरस्कारावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब केलेला नाही. अशा परिस्थितीत नावाचा विचार केला जाऊ शकतो, असे म्हटले आहे.

Web Title: Knowledge displeases because of ignoring the Dronacharya Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.