केकेआरचे मिशन ‘दिल्ली’
By Admin | Updated: April 28, 2017 15:12 IST2017-04-28T15:01:41+5:302017-04-28T15:12:24+5:30
धडाकेबाज विजयांमुळे आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१० मध्ये शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमविण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

केकेआरचे मिशन ‘दिल्ली’
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 28 - धडाकेबाज विजयांमुळे आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१० मध्ये शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमविण्याच्या इराद्याने उतरणार आहे.
केकेआरने यंदा शानदार खेळ केला असून आठ सामन्यांत संघाचे १२ गुण झाले. दुसरीकडे, डेअरडेव्हिल्सचे ६ सामन्यांत चारच गुण झाले. त्यामुळे संघ आठव्या स्थानावर पोहोचला. आरसीबीला ४९ धावांत गुंडाळल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या केकेआरने बुधवारी रायझिंग पुणे सुपरजायंटला ७ गड्यांनी पराभूत केले. होमग्राउंडवर हा सामना जिंकून गुणतालिकेत टॉपवर पोहचण्याचे केकेआरचे लक्ष्य असेल.
मागच्या तिन्ही सामन्यांत पराभूत झालेला दिल्ली संघ ६ दिवसांनंतर सामना खेळणार आहे. कर्णधार झहीर खान आणि कोच राहुल द्रविड यांना ब्रेकनंतर खेळण्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा आहे. पण हा गॅप त्यांना सुस्ती आणणारा ठरतोय कि विजयी करतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.