केकेआर विजयी : पुणे स्पर्धेतून बाहेर
By Admin | Updated: May 15, 2016 04:35 IST2016-05-15T04:35:30+5:302016-05-15T04:35:30+5:30
गोलंदाजांची शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर युसूफ पठाणच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने पावसाचा व्यत्यय आलेल्या आयपीएल लढतीत रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघावर विजय मिळवला.

केकेआर विजयी : पुणे स्पर्धेतून बाहेर
कोलकाता : गोलंदाजांची शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर युसूफ पठाणच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने पावसाचा व्यत्यय आलेल्या आयपीएल लढतीत रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघावर विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुणे सुपर जायंट्स संघाची स्थिती १७.४ षटकात ६ बाद १0३ अशी झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले. सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे विजयासाठी ९ षटकांत ६६ धावांचे लक्ष्य मिळाले हे लक्ष्य कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५ षटकात २ गडी गमावून पूर्ण केले. युसूफ पठाणने १८ चेंडूत ४ चौकार ३ षटकारासह नाबाद ३७ आणि मनीष पांडेने नाबाद १५ धावा केल्या.
युसूफ पठाणने तिसरे षटक टाकणाऱ्या आर. अश्विन याच्या एकाच षटकात २ चैकार व २ षटकारासह मनीष पांडेच्या साथीने २२ धावा वसूल केल्या. तसेच त्याने मनीष पांडेच्या साथीने २७ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी करीत कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयावर शिक्कामार्तब केले. पुणे संघाकडून अश्विनने २ गडी बाद केले. या विजयामुळे कोलकाता नाईड रायडर्सचे ११ सामन्यात १४ गुण झाले आहेत.
त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाने पावसाचा व्यत्यय
येण्याआधी १७.४ षटकात ६ बाद
१0३ धावा केल्या होत्या. त्या वेळी धोनी ८ धावांवर नाबाद होता. पुणे संघाकडून जॉर्ज बेलीने सर्वाधिक
२७ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३३ आणि उस्मान ख्वाजा याने १७ चेंडूंत ३ चौकारांसह २१
धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून पीयूष चावलाने २१ धावांत २ बळी घेतले.
(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : रायजिंग पुणे सुपर जायंटस् : १७.४ षटकांत ६ बाद १0३.
(जॉर्ज बेली ३३, उस्मान ख्वाजा २१, सौरभ तिवारी १३, थिसारा परेरा १३, पीयूष चावला २/२१, शकीब अल हसन १/२१, आंद्रे रसेल १/११, अंकित राजपूत १/१४).
कोलकाता नाईट रायडर्स : ५ षटकात २ बाद ६६. (युसूफ पठाण नाबाद ३७, मनीष पांडे नाबाद १५. अश्विन २/३0).