केकेआरचा सलग पाचवा विजय

By Admin | Updated: May 21, 2014 02:44 IST2014-05-21T02:44:22+5:302014-05-21T02:44:22+5:30

कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जचा ८ गडी व २ षटके शिल्लक राखून पराभव केला

KKR lead fifth straight win | केकेआरचा सलग पाचवा विजय

केकेआरचा सलग पाचवा विजय

कोलकाता : गोलंदाजांच्या अचूक मार्‍यानंतर रॉबिन उथप्पा(६७ धावा, ३९ चेंडू, १० चौकार, १ षटकार) व शाकिब अल-हसन (नाबाद ४६ धावा, २१ चेंडू, ६ चौकार, २ षटकार) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जचा ८ गडी व २ षटके शिल्लक राखून पराभव केला आणि आयपीएलच्या सातव्या पर्वात सातवा विजय मिळवित प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली. केकेआर संघाचा हा सलग पाचवा विजय ठरला. कोलकाताने चेन्नईचा डाव ४ बाद १५४ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १८ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना उथप्पा व कर्णधार गंभीर (२१) यांनी सलामीला ६४ धावांची भागीदारी करीत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. सलामीवीर माघारी परतल्यानंतर मनीष पांडे (नाबाद १८) व शाकिब-अल-हसन (नाबाद ४६) यांनी तिसर्‍या विकेटसाठी ५८ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. त्याआधी, सुरेश रैनाच्या (६५ धावा, ५२ चेंडू, ३ चौकार, ५ षटकार) अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने आव्हानात्मक धावसंख्येची मजल मारली. चेन्नईच्या डावात ब्रॅन्डन मॅक्युलम (२८), फॅफ ड्यूप्लेसिस (२३) आणि महेंद्रसिंग धोनी (नाबाद २१) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. कोलकाता नाईटरायडर्सतर्फे सुनील नरेन व पीयूष चावला यांनी अनुक्रमे २४ व ४२ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी १ बळी घेतला. (वृत्तसंस्था)

Web Title: KKR lead fifth straight win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.