किंग्ज इलेव्हनपुढे केकेआरचे आव्हान
By Admin | Updated: April 19, 2016 03:36 IST2016-04-19T03:36:55+5:302016-04-19T03:36:55+5:30
पुणे सुपरजायंट्सविरुद्ध पहिला विजय नोंदवणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला उद्या (मंगळवारी) इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत दोनदा जेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सच्या

किंग्ज इलेव्हनपुढे केकेआरचे आव्हान
मोहाली : पुणे सुपरजायंट्सविरुद्ध पहिला विजय नोंदवणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला उद्या (मंगळवारी) इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत दोनदा जेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. किंग्ज इलेव्हनच्या गृहमैदानावर खेळल्या जाणाऱ्या या लढतीत केकेआरच्या अष्टपैलू खेळाडूंना रोखणे यजमान संघासाठी आव्हान ठरणार आहे.
केकेआरने तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळवताना चार गुणांची कमाई केली आहे, तर किंग्ज इलेव्हनने रविवारी पुणे संघाविरुद्ध सहा गडी राखून सरशी साधताना विजयाचे खाते उघडले. कागदावर केकेआर संघ समतोल दिसत असून, किंग्ज इलेव्हनविरुद्ध या संघाचे पारडे वरचढ भासत आहे. टी-२०मध्ये मात्र संघाचे यश सामन्याच्या दिवशी झालेल्या कामगिरीवर अवलंबून असते. केकेआर संघाची फलंदाजीची फळी मजबूत असून, किंग्ज इलेव्हन संघाची गोलंदाजीची बाजू बळकट आहे. त्यामुळे उभय संघांदरम्यान खेळली जाणारी लढत रंगतदार होण्याची आशा आहे. पुणे संघाविरुद्धच्या लढतीत पंजाब संघाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला होता. मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर पंजाब संघाचा गोलंदाज मोहित शर्माच्या ‘स्लोअर वन’ चेंडूंना कसा सामोरा जातो, याबाबत उत्सुकता आहे.
उभय संघ यातून निवडणार
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), पीयूष चावला, जॉन हेस्टिंग्ज, बॅ्रड हॉग, जेसन होल्डर, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, ख्रिस लिन, मनन शर्मा, मोर्ने मॉर्केल, कॉलिन मन्रो, सुनील नारायण, मनीष पांडे, युसूफ पठाण, अंकित राजपूत, आंद्रे रसेल, राजगोपाल सतीश, शकिबुल हसन, जयदेव उनाडकट, रॉबिन उथप्पा, सूर्यकुमार यादव आणि उमेश यादव.
किंग्ज इलेवन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), काईल अॅबोट, मुरली विजय, मनन व्होरा, मिचेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अनुरितसिंग, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा, प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मार्क्स स्टोइनिस, स्वप्निल सिंग, अरमान जफर, फरहान बेहरदिन, के.सी. करिअप्पा, ऋषी धवन, गुरकीरतसिंग मान, निखिल नाईक आणि शार्दूल ठाकूर.