के.के. बॉइज अंतिम फेरीत
By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:11+5:302015-07-22T00:34:11+5:30
कामुर्ली : ओशेल बॉइज संघावर २-० ने मात करीत के. के. बॉइज संघाने चौथ्या आंतरवार्ड फुटबॉल स्पर्धेतील सलग दुसर्या विजयाची नोंद केली. याबरोबरच त्यांनी अंतिम फेरीत स्थान पक्के केले. ही लढत वागाळी येथील काजरो मैदानावर झाली.

के.के. बॉइज अंतिम फेरीत
क मुर्ली : ओशेल बॉइज संघावर २-० ने मात करीत के. के. बॉइज संघाने चौथ्या आंतरवार्ड फुटबॉल स्पर्धेतील सलग दुसर्या विजयाची नोंद केली. याबरोबरच त्यांनी अंतिम फेरीत स्थान पक्के केले. ही लढत वागाळी येथील काजरो मैदानावर झाली. विजयी संघाकडून गोपी केसरकर व यश पेडणेकर यांनी गोल नोंदवले. नेहाल दळवी, प्रशांत नाईक, वैभव पार्सेकर, भिकाजी पेडणेकर, उत्कर्ष नाईक, सचिन नाईक, गौतम पार्सेकर यांनीही उत्कृष्ट खेळ केला. पराभूत संघाकडून आल्बिनो फर्नांडिस, मेकविन फर्नांडिस, ब्रॅडली लोबो, न्युबर्ट फर्नांडिस यांनी गोल करण्याच्या संधी वाया घालविल्या. जोरदार पावसात सामना खेळविल्याने खेळपी निसरडी झाली होती. यामुळे चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी खेळाडूंना कसरत करावी लागली. या विजयाबरोबरच के. के. बॉइजने दोन सामन्यांतून दोन विजयांसह सहा गुण मिळवले आहेत. खैराट बॉइज व ओशेल बॉइज संघाचे प्रत्येकी दोन सामन्यांतून तीन गुण झाले आहेत. स्पर्धेतील शेवटचे साखळी सामने रविवारी (दि.२६) खेळविण्यात येतील.