किवींची विंडीजवर पकड
By Admin | Updated: June 11, 2014 02:54 IST2014-06-11T02:54:44+5:302014-06-11T02:54:44+5:30
दुस:या दिवशी 7 बाद 5क्8 या जबरदस्त धावसंख्येवर त्यांचा डाव घोषित केला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने पहिल्या डावात दिवसअखेर बिनबाद 19 धावा केल्या

किवींची विंडीजवर पकड
>किंग्जस्टन : केन विल्यम्सन (113) याच्यानंतर जेम्स निशामच्या 1क्7 धावांच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने वेस्ट इंडीजसमोर पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस:या दिवशी 7 बाद 5क्8 या जबरदस्त धावसंख्येवर त्यांचा डाव घोषित केला.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने पहिल्या डावात दिवसअखेर बिनबाद 19 धावा केल्या. सलामीवीर ािस गेल 8 आणि केरॉन पॉवेल 11 धावांवर खेळत होते. यजमान संघ अजूनही 489 धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे सर्वच्या सर्व फलंदाज बाकी आहेत.
अष्टपैलू जेम्स निशाम पदार्पणाच्या पहिल्या दोन कसोटींत सलग दोन शतके झळकावणारा न्यूझीलंडचा पहिला आणि जगातील आठवा फलंदाज बनला. याआधी निशामने भारताविरुद्ध आपल्या पदार्पणीय कसोटीतच नाबाद 137 धावा केल्या, तर दुस:या कसोटीत त्याने 171 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 1क्7 धावांची खेळी केली. निशामशिवाय भारताचा माजी कर्णधार मोहंमद अजहरुद्दीननेही सलग तिन कसोटींत शतक ठोकले होते. तसेच पोन्सफोर्ड, डग वॉल्टर्स, एल्विन कालीचरण, ग्रेग ब्लुवेट, सौरभ गांगुली, रोहित शर्मा यांच्या नावांवरही ही उपलब्धी आहे. (वृत्तसंस्था)
स्पेनही लक्ष वेधून..
न्यूझीलंड संघाने दुस:या दिवशी 2 बाद 24क् या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. केन विल्यम्सन (1क्5) आणि रॉस टेलर (32) यांनी आज पुढे खेळण्यास सुरुवात केली; परंतु आठ धावांची भर पडते न पडते तोच विल्यम्सन 113 धावांवर , तर टेलर 55 धावांवर बाद झाला, तर कर्णधार ब्रॅण्डन मॅक्युलम (क्7) स्वस्तात तंबूत परतला. निशामने शतक ठोकताना न्यूझीलंडला मजबूत स्थितीत पोहोचवल़े निशाम आणि वॉटलिंग यांनी सहाव्या गडय़ासाठी 2क्1 धावा केल्या.