मुंबई : वरळी सी-लिंक ते गेट वे ऑफ इंडियाचे हे ३८ किलोमीटरचे अंतर सलग सात तास २२ मिनिटे पोहत सोलापूरच्या कीर्ती भराडिया हिने विश्वविक्रम नोंदवला. १६ वर्षांच्या कीर्तीने मुंबईच्या समुद्राचे आव्हान यशस्वीपणे पार करत सर्वांना प्रभावित केले.अरबी समुद्रात ३८ किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर पार करण्यासाठी कीर्तीने गुरुवारी ११.५२ वाजता सुरुवात केली. ती सायंकाळी ७.१५ वाजता ती गेट वे ऑफ इंडियाला पोहोचली, असे कीर्तीचे वडील नंदकिशोर भराडिया यांनी सांगितले. कीर्तीने हे अंतर सलग सात तास २२ मिनिटांमध्ये पार करत विक्रमी कामगिरी केली. या विक्रमाचे परीक्षण करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अधिकारी पूर्णवेळ उपस्थित होते. विश्वविक्रमासाठी गुणांकनाचे काम रात्री उशिरापर्यंत झाले. कीर्तीला प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.
सलग सात तास समुद्रात पोहत कीर्तीचा विश्वविक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 06:43 IST