किंग्ज इलेव्हन पंजाबचं केकेआरसमोर 171 धावांचं लक्ष्य
By Admin | Updated: April 14, 2017 01:36 IST2017-04-13T22:15:52+5:302017-04-14T01:36:41+5:30
आयपीएल 10च्या पर्वात किंग्ज इलेव्हन पंजाबनं निर्धारित 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 170 धावा केल्या आहेत.

किंग्ज इलेव्हन पंजाबचं केकेआरसमोर 171 धावांचं लक्ष्य
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 13 - आयपीएल 10च्या पर्वात किंग्ज इलेव्हन पंजाबनं निर्धारित 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 170 धावा केल्या आहेत. पंजाबनं विजयासाठी कोलकात्यासमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात मिलर आणि साहा 57 धावांची सर्वाधिक भागीदारी केली आहे. अमलानं 27 चेंडूंत चार चौकारांसह 25 धावा केल्या आहेत. तर मिलरनं 19 चेंडूंमध्ये 28 धावा रचल्या आहेत. मॅक्सवेल आणि संदीप शर्मा शेवटपर्यंत मैदानावर टिकून होते. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
पंजाबला फलंदाज आमला आणि व्होरानं चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र पीयूषच्या फिरकीनं वोहराला माघारी पाठवत संघाला पहिले यश मिळवून दिले, तर नरेन यांनी स्टोन्सचा बळी मिळवत पंजाबला धक्का दिला होता. कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने चांगली फटकेबाजी केली. मात्र तोही यादवच्या भेदक गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या डेव्हिड मिलर आणि वृद्धिमान यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत संघाला 150 वर धावसंख्या उभारून दिली. पंजाबकडे 155 धावांची आघाडी असताना उमेश यादवने डेव्हिड मिलरला माघारी धाडले.