किंग्ज इलेव्हन पंजाबचे वर्चस्व कायम
By Admin | Updated: May 26, 2014 01:27 IST2014-05-26T01:27:00+5:302014-05-26T01:27:00+5:30
पंजाब संघाने दिल्ली संघाचा डाव १८.१ षटकांत ११५ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा १३.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे वर्चस्व कायम
मोहाली : गोलंदाजांच्या अचूक मार्यानंतर मनन व्होरा व डेव्हिड मिलर यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने ‘आयपीएल’च्या सातव्या पर्वांत स्पर्धेची औपचारिकता पूर्ण करणार्या अखेरच्या साखळी सामन्यात आज, रविवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ७ गडी राखून पराभव केला. पंजाब संघाला क्वालिफायरच्या पहिल्या लढतीत २७ रोजी ईडन्सवर कोलकाता नाईट रायडर्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा हा ११ वा विजय ठरला, तर दिल्ली संघाला सलग नववा पराभव स्वीकारावा लागला. पंजाब संघाने १४ सामन्यांत ११ विजयांसह २२ गुणांची कमाई केली. दिल्ली संघाला केवळ ४ गुणांची कमाई करता आली. पंजाब संघाने दिल्ली संघाचा डाव १८.१ षटकांत ११५ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा १३.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. आव्हान पेलताना पंजाब संघाच्या विजयात मनन व्होरा (४७ धावा, ३८ चेंडू, ४ चौकार, २ षट्कार) आणि डेव्हिड मिलर (नाबाद ४७ धावा, ३४ चेंडू, ४ चौकार, २ षट्कार) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. त्याआधी कर्णधार पिटरसनच्या (५८) अर्धशतकी खेळीनंतरही डेअरडेव्हिल्सचा डाव ११५ धावांत संपुष्टात आला. पंजाबतर्फे अवाना, करणवीर सिंग, जॉन्सन व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)