बेंगळुरविरुद्ध चेन्नईच किंग, २४ धावांनी केला पराभव
By Admin | Updated: May 4, 2015 20:04 IST2015-05-04T17:59:38+5:302015-05-04T20:04:06+5:30
मिशेल स्टार्कचा तेजतर्रार मारा व त्याला अन्य गोलंदाजांनी दिलेली मोलाची साथ यामुळे चेन्नईच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली.

बेंगळुरविरुद्ध चेन्नईच किंग, २४ धावांनी केला पराभव
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ४ - आशिष नेहरा, ड्वॅन ब्राव्हो व ईश्वर पांडे या त्रिकुटाच्या अचूक मा-याने चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर बेंगळुरवर २४ धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईचे १४९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बेंगळुरची डाव अवघ्या १२४ धावांवरच आटोपला.
सोमवारी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगळुर हे संघ आमने सामने आहेत. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रँडन मॅक्यूलम व ड्वॅन स्मिथ ही सलामीची जोडी अवघ्या ३४ धावांमध्येच तंबूत परतली. यानंतर सुरेश रैनाने ५२ धावांची झुंझार खेळी केली. फाफ डू प्लेसिसने २४ तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २९ धावांची खेळी करत रैनाला साथ दिली. मात्र यानंतर रविंद्र जडेजा, पवन नेगी, ड्वॅन ब्राव्हो हे फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने चेन्नईला २० षटकात फक्त १४८ धावाच करता आल्या. बेंगळुरतर्फे स्टार्कने ४ षटकांत २४ धावा देत ३ विकेट घेतल्या. तर हर्षल पटेल व डेव्हिड वीस यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
चेन्नईचे १४९ धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बेंगळुरच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली. कर्णधार विराट कोहलीच्या ४८ धावांची खेळी वगळता उर्वरित एकाही फलंदाजांला मोठी खेळी करता आली नाही. एबी डिव्हिलीयर्स २१ व दिनेश कार्तिकच्या २३ धावांची छोटी खेळी केली. चेन्नईच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे बेंगळुरुचे विराट कोहली व मनदीप सिंग हे दोन फलंदाज धावबाद झाले. बेंगळुरुचा डाव १९.४ षटकांत १२४ धावांवर आटोपला. आशिष नेहराने ३ तर ईश्वर पांडे व ड्वॅन ब्राव्होने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.