खो-खो

By Admin | Updated: July 4, 2014 23:28 IST2014-07-04T23:28:20+5:302014-07-04T23:28:20+5:30

परदेशात होणार खो-खोच्या स्पर्धा

Kho-Kho | खो-खो

खो-खो

देशात होणार खो-खोच्या स्पर्धा
खो-खो हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावा या दृष्टीने हा खेळ मातीऐवजी मॅटवर खेळवला जाणार आहे. त्यादृष्टीने मॉरिशस, थायलंड, घाना, नायजेरिया, केनिया येथे भारताचा खो-खो संघ स्पर्धा खेळणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे सचिव चंद्रजित जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली.
लोकप्रियता वाढेल
मॅटमुळे खो-खो हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहोचेल आणि या खेळाची लोकप्रियता वाढेल. इंग्रजी प्रशालेत बंद झालेला हा खेळ पुन्हा सुरू होण्यास मदत होईल. तसेच या खेळात आम्हाला आणखी चांगले खेळाडू मिळतील, असा विश्वास जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे यांनी व्यक्त केला.
शालेय स्पर्धा मॅटवर
संघटनेतर्फे होणारी शालेय साखळी खो-खो स्पर्धा मॅटवर खेळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे संघटनेचे सचिव गोविंद शर्मा म्हणाले.
नाममात्र शुल्कावर देणार
मॅटची मागणी झाल्यास संस्थेची परिस्थिती, तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शक आणि शहनिशा करूनच प्रशिक्षण शिबीर आणि स्पर्धेसाठी नाममात्र शुल्कावर खो-खो खेळाची मॅट दिली जाईल. त्याचप्रमाणे विभागीय क्रीडा संकुलावरील कुस्ती खेळाची मॅटही मागणीप्रमाणे संघटनेला दिली जाईल, असे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले. खेळाडूंना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलच्या छताचीही तातडीने दुरुस्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Kho-Kho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.