विविध क्रीडा स्पर्धांमध्ये केटीएचएमचे सुयश
By Admin | Updated: August 28, 2014 01:07 IST2014-08-26T21:56:14+5:302014-08-28T01:07:48+5:30
नाशिक : विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये केटीएचएम महाविद्यालयाने यश मिळविले आहे.

विविध क्रीडा स्पर्धांमध्ये केटीएचएमचे सुयश
नाशिक : विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये केटीएचएम महाविद्यालयाने यश मिळविले आहे.
एम. एस. जी. कॉलेज मालेगाव येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत केटीएचएम महाविद्यालयातील मुलांच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले. संगमनेर येथे होणार्या विभागीय स्पर्धेसाठी कुंदन सोनवणे, राकेश खैरनार, सौरभ पाटील यांची निवड झाली.
वणी येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन खो खो स्पर्धेतून शेवगाव येथे होणार्या विभागीय स्पर्धेसाठी सुशील महाजन, गुलाब दिवे तसेच नगर येथे होणार्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी अमोल कांबळे, अवधूत माळी या खेळाडूंची निवड झाली. या खेळाडूंना बी. बी. पेखळे यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)