शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

दहावीच्या अभ्यासाची पुस्तकेही सोबत आणलीत की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 01:34 IST

खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील खो-खो संघात ६ खेळाडू दहावीतील

- अमोल मचाले 

पुणे  - 'खेलो इंडिया यूथ गेम्स'च्या निमित्ताने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळाडूंच्या रूपातील १७ तसेच २१ वर्षांखालील मुला-मुलींचा जणू कुंभमेळाच भरला आहे. स्पर्धेत अव्वल कामगिरी करण्याचा निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतो. स्पर्धेत सहभागी खेळाडूंपैकी या अनेक खेळाडू दहावी तसेच बारावीत शिकणारे आहेत. १७ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र संघात दहावीत शिकणाऱ्या एक-दोन नव्हे तर, तब्बल ६ खेळाडू आहेत. दहावीचा अभ्यास महत्वाचा असल्याने स्पर्धेच्या काळात अभ्यास बुडणार नाही का, असा प्रश्न विचारल्यावर "अभ्यासाची पुस्तकेही सोबत आणलीत की! रात्री आम्ही एक तास अभ्यासही करतो," असे दमदार उत्तर देताना पुण्यातील नियती बंगाले या खेळाडूचा चेहरा स्पर्धेसोबतच दहावीच्या परीक्षेतही यश मिळवण्याचा निर्धाराने सायंप्रकाशात अधिकच उजळून निघाला होता.

१५ वर्षीय नियती ही रेणुका स्वरूप शाळेत दहावीत शिकत आहे. तिचे वडील साईट इंजिनिअर असून आई घरकाम करते. चौथीपर्यंत लंगडी खेळणाऱ्या नियतीच्या खेळातील वेग बघून प्रशिक्षक प्रशांत ओक यांनी तिला खो-खो खेळण्याचा सल्ला दिला. आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभत असल्याने दहावीला शिकत असूनही मी या स्पर्धेत सहभागी झाल्याचे तिने आवर्जून सांगितले.  नियती ही राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा खेळली आहे. मागील वर्षी सुवर्ण जिंकणाऱ्या महाराष्ट्र संघातही तिचा समावेश होता.

 

 

सुवर्णपदकच जिंकायचे आहे 

या सर्व मुलींच्या निरागस चेहऱ्यांवर सुवर्णपदक जिंकण्याचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत होता. या गटात महाराष्ट्र संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. "गुजरातचा संघही ताकदीचा आहे. मात्र आम्हाला महाराष्ट्राला सुवर्णपदकच जिंकून द्यायचे आहे," असा निर्धार नियतीसह सर्व मुलींनी व्यक्त केला.

परीक्षेतही यश मिळवू...

पुण्यात पर्वती येथे राहणाऱ्या नियतीसह पुणे जिल्ह्यातील इंदापूरची साक्षी करे, उस्मानाबादच्या गौरी शिंदे आणि किरण शिंदे, ठाण्याची दिशा सोनसुरकर तसेच सांगलीची रितिका मगदूम या महाराष्ट्र संघातील खेळाडू येत्या १ मार्चपासून दहावीची परीक्षा देणार आहेत. खेळासोबतच आम्हाला शिक्षणही महत्वाचे वाटते ही त्यांची सामुहिक प्रतिक्रिया होती. "स्पर्धेसाठी आम्ही इथे आलो असताना सोबत अभ्यासाची पुस्तकेही आणली आहेत. सराव शिबिर सुरू होते तेव्हा आम्ही २ तास अभ्यास करायचो. आता स्पर्धेदरम्यान निवासाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी रात्री किमान एक तास आम्ही अभ्यास करतो. गरज भासते तेव्हा सहाजणी सामूहिक अभ्यास करतो. कधी कधी गटाने तर कधी एकत्र अभ्यास करून आमची परिक्षेची तयारी सुरू आहे," असे नियतीने 'लोकमत'ला सांगितले. या स्पर्धेबरोबरच दहावीच्या परीक्षेत ही आम्ही अपेक्षित यश मिळवू, असा विश्वास या ६ खेळाडूंनी व्यक्त केला.

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019Maharashtraमहाराष्ट्र