शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

खेलो इंडिया : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 22:37 IST

टेबल टेनिस, नेमबाजी, ज्युदोमध्ये देखील पदकांची कमाई

गुवाहटी : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे जिम्नॅस्टिक्समध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावित निर्विवाद वर्चस्व गाजविले. या क्रीडा प्रकारातील शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या आदिती दांडेकर हिने २१ वर्षाखालील रिदमिक विभागात हूप व क्लब प्रकारात सोनेरी कामगिरी केली आणि महत्त्वाचा वाटा उचलला. तसेच तिने चेंडू प्रकारात रौप्यपदक तर रिबन प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली.  

रिचा चोरडियाने हूप व चेंडू प्रकारात ब्राँझपदक मिळविले. अनन्या सोमणने रिबनमध्ये रौप्यपदक तर क्लब प्रकारात ब्राँझपदकावर नाव कोरले. वैदेही देऊळकर हिला व्हॉल्ट प्रकारात ब्राँझपदक मिळाले. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात श्रेयस चौधरी याने हॉरिझॉन्टल बार प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्याचा सहकारी ओंकार शिंदे याला ब्राँझपदक मिळाले.* नेमबाजीत हर्षवर्धनला सुवर्ण    नेमबाजीत २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात पुण्याच्या हर्षवर्धन यादव याने पात्रता फेरीतील चुका सुधारून अंतिम फेरीत सरस नेमबाजी करताना २१ वर्षांखालील गटात सुवर्णपदक मिळविले. हर्षवर्धन ५६८ गुणांसह तिस-या क्रमांकाने अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. त्यानंतर अंतिम फेरीत त्याने अधिक अचूकता राखताना ३१ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. हरियानाचा आयुष सिगं रौप्य, तर पंजाबचा राजकंवर सिंग ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.*संपदाला ज्युडोत रौप्य    महाराष्ट्राच्या संपदा फाळके हिला ज्युडोमध्ये २१ वर्षांखालील गटात ७८ पेक्षा कमी किलो वजन प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत तिला मणिपूरच्या माबाम इंदुबाला हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर तिने केरळच्या ज्योलसाना हिला हरवून अंतिम फेरी गाठली होती.

*टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला तीन रौप्य    महाराष्ट्राच्या रिगान अलबुकर्क, सृष्टी हेलंगडी व ह्रषिकेश मल्होत्रा यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या १७ वषार्खालील गटात ह्रषिकेश याला अंतिम लढतीत दिल्लीच्या आदर्श छेत्री याने १४-१२, ८-११, ११-३, ११-९, ११-८ असे हरविले. २१ वषार्खालील गटात रिगान याला तेलंगणाच्या फिडेल रफिक सूरवजुला याने पराभूत केले.  रिगान याने हा सामना ११-९, १०-१२, १०-१२, ११-५, ८-११, ६-११ असा गमावला. मुलींच्या २१ वषार्खालील गटात अनुष्का कुटुंबळे या मध्यप्रदेशच्या खेळाडूने सृष्टीचा ११-४, ११-९, ११-३, ११-३ असा पराभव केला.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाMaharashtraमहाराष्ट्र