शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

खेलो इंडिया २०१९ : कोल्हापूरचा मल्ल प्रवीण पाटीलने जिंकले सुवर्णपदक, पहिल्या दिवशी राज्याला कुस्तीत एकूण ५ पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 20:43 IST

'खेलो इंडिया २०१९'मध्ये कोल्हापूरचा मल्ल प्रवीण पाटील याने उद्घाटनाच्या दिवशीच धडाकेबाज कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले.

- अमोल मचाले

पुणे - 'खेलो इंडिया २०१९'मध्ये कोल्हापूरचा मल्ल प्रवीण पाटील याने उद्घाटनाच्या दिवशीच धडाकेबाज कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. कुस्तीत बुधवारी यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकूण ५ पदकांची कमाई केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. कोल्हापूरच्या प्रवीणने १७ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात ५५ किलोखालील वजन गटात बाजी मारली. अटीतटीच्या अंतिम फेरीत त्याने हरियाणाचा मल्ल ललितवर १०-९ने सरशी साधली.

१७ वर्षांखालील मुलांच्या ९२ किलो वजन गटात महाराष्ट्राचा पृथ्वीराज खडके रौप्यपदकाचा मानकरी ठरला. दिल्लीच्या नवीन पुनियाविरुद्धची त्याची लढत एकतर्फी ठरली. यात नवीनने पृथ्वीराजचा १२-०ने धुव्वा उडविला. अमृत रेडकर आणि कुंदन या राज्याच्या खेळाडूंनी आपापल्या गटांत कांस्यपदक प्राप्त केले. अमृत हा १७ वर्षांखालील मुलांच्या ६५ किलो वजनगटात तेजवीरकडून ४-८ने पराभूत झाला. २१ वर्षांखालील मुलांच्या ६७ किलो वजनगटात झालेल्या उपांत्य लढतीत मलकित हुडा याने कुंदनवर ६-०ने एकतर्फी विजय मिळवला.

ज्ञानेश्वर देसाईचे सुवर्ण हुकले१७ वर्षांखालील मुलांच्या ५१ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या ज्ञानेश्वर देसाई याचे सुवर्ण थोडक्यात हुकले. अतिशय रंगतदार ठरलेल्या अंतिम लढतीत त्याला मणिपूरच्या के. एल. सिंगकडून ३-४ अशा निसटत्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या निर्णायक लढतीत ज्ञानेश्वरने प्रतिस्पर्ध्याला चांगलेच झुंजवले. मात्र निर्णायक क्षणी के. एल. सिंग याने सरस खेळ करीत सुवर्ण आपल्या नावे केले अन् ज्ञानेश्वरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019Khelo Indiaखेलो इंडियाWrestlingकुस्ती