केविन पीटरसनची मोहम्मद अली यांना अनोखी श्रद्धांजली
By Admin | Updated: June 6, 2016 21:46 IST2016-06-06T21:46:24+5:302016-06-06T21:46:24+5:30
इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसन याने आपल्या हातावर दिवंगत मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांचा टॅटू काढून त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. केविन पीटरसनने इन्स्टाग्रामवर

केविन पीटरसनची मोहम्मद अली यांना अनोखी श्रद्धांजली
>ऑनलाइन लोकमत
लंडन, ६ - इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसन याने आपल्या हातावर दिवंगत मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांचा टॅटू काढून त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. केविन पीटरसनने इन्स्टाग्रामवर आपले छायाचित्र शेअर केलं असून त्याच्या हातावर त्याने मोहम्मद अली यांचा टॅटू काढल्याचे दिसत आहे.
देश-विदेशातील अनेक व्यक्तींनी निरनिराळ्या प्रकारे अली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हेवीवेट बॉक्सिंगमध्ये तीन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या जगभरातील चाहत्यांचा ‘बॉक्सिंग आयडॉल’ मोहम्मद अली यांचे शनिवारी श्वसनाच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला होता.