केवीन पीटरसन आयपीएलमधून बाहेर

By Admin | Updated: April 24, 2016 09:27 IST2016-04-24T09:27:04+5:302016-04-24T09:27:04+5:30

खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या रायझिंग पुणे सुपर जायंटस संघाला आणखी एक धक्का बसला आहे.

Kevin Pietersen out of IPL | केवीन पीटरसन आयपीएलमधून बाहेर

केवीन पीटरसन आयपीएलमधून बाहेर

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २४ - खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या रायझिंग पुणे सुपर जायंटस संघाला आणखी एक धक्का बसला आहे. पुण्याचा महत्वाचा फलंदाज केवीन पीटरसन दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेबाहेर गेला आहे. पीटरसनच्या उजव्या पोटरीची दुखापत गंभीर असल्याने त्याला आयपीएलच्या उर्वरित हंगामात एकही सामना खेळता येणार नाही. 
 
शुक्रवारी पुण्याच्या चौथ्या सामन्यात पीटरसन फक्त एक चेंडू खेळल्यानंतर धाव घेत असताना त्याची पोटरीची दुखापत बळावली होती. त्याला उचलून मैदानाबाहेर न्यावे लागले होते. त्यावेळीच पीटरसनच्या उर्वरित हंगामात खेळण्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. 
 
दुखापत हा खेळाचा भाग आहे. माझ्या पोटरीमध्ये प्रचंड वेदना होत आहेत. संघाला सोडून जाताना वाईट वाटत आहे असे पीटरसनने म्हटले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळताना पीटरसनला ही दुखापत झाली होती. 
 

Web Title: Kevin Pietersen out of IPL