बीसीसीआय बैठकीपासून श्रीनिवासन यांना दूर ठेवा

By Admin | Updated: August 28, 2015 01:16 IST2015-08-28T01:16:58+5:302015-08-28T01:16:58+5:30

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी याचिका दाखल करणारे क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी कोलकाता येथे उद्या शुक्रवारी होणाऱ्या कार्य समितीच्या

Keep Srinivasan out of the BCCI meeting | बीसीसीआय बैठकीपासून श्रीनिवासन यांना दूर ठेवा

बीसीसीआय बैठकीपासून श्रीनिवासन यांना दूर ठेवा

नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी याचिका दाखल करणारे क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी कोलकाता येथे उद्या शुक्रवारी होणाऱ्या कार्य समितीच्या बैठकीत भाग घेण्यापासून रोखा, असे आवाहन केले आहे. या संदर्भात वर्मा यांनी बोर्डाचे कायदेशीर सल्लागार यू. एन. बॅनर्जी तसेच कार्य समितीच्या सर्वच सदस्यांना पत्र लिहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २२ जानेवारी आणि २१ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निर्णयाचा हवाला देऊन नियमांची पायमल्ली होऊ नये, असे वर्मा म्हणाले. न्यायालयाने श्रीनिवासन यांना बैठकीत सहभागी होण्यापासून रोखले होते. श्रीनिवासन यांनी ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर कोर्टाने तीव्र नापसंती व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Keep Srinivasan out of the BCCI meeting