शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

कर्नाटक २४४ धावांत गारद

By admin | Updated: March 18, 2015 02:07 IST

नमन ओझाचे विक्रमी सहा झेल यांच्या जोरावर शेष भारत संघाने इराणी कप क्रिकेट सामन्यात रणजी चॅम्पियन कर्नाटक संघाचा पहिला डाव मंगळवारी २४४ धावांत गुंडाळला.

बंगळुरू : भारतीय कसोटी संघाचा सदस्य असलेला वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोनची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी व यष्टिरक्षक नमन ओझाचे विक्रमी सहा झेल यांच्या जोरावर शेष भारत संघाने इराणी कप क्रिकेट सामन्यात रणजी चॅम्पियन कर्नाटक संघाचा पहिला डाव मंगळवारी २४४ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात खेळताना पहिल्या दिवसअखेर शेष भारत संघाने उन्मुक्त चंदला गमावित २० धावा केल्या. कर्नाटकचा कर्णधार विनयकुमारने उन्मुक्तला डावाच्या पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केले. आजचा खेळ थांबला त्या वेळी जीवनज्योत सिंग (१६) आणि पारस डोगरा (४) खेळपट्टीवर होते. त्याआधी, अ‍ॅरोनने ६३ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. प्रथम श्रेणी कारकिर्दीत अ‍ॅरोनने डावात प्रथमच सहा बळी घेण्याची कामगिरी केली. ओझाने यष्टीपाठी चमकदार कामगिरी करताना ६ झेल टिपले. त्याने इराणी कप स्पर्धेत एका डावात सर्वाधिक बळी घेणारा यष्टिरक्षक नयन मोंगियाच्या विक्रमाची बरोबरी केली. कर्नाटकने अखेरच्या ६ विकेट केवळ २४ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. त्यापूर्वी, शेष भारत संघाने नाणेफेक जिंकून कर्नाटकला प्रथम फलंदाजी दिली. रणजी चॅम्पियन कर्नाटक संघाची सुरुवात निराशाजनक झाली. मयंक अग्रवाल (६८), करुण नायर (५९) आणि अभिषेक रेड्डी (५४) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाला २०० धावांचा पल्ला ओलांडता आला. या तीन फलंदाजांचा अपवाद वगळता कर्नाटकच्या अन्य फलंदाजांना २० धावांच्या पुढे मजल मारता आली नाही. (वृत्तसंस्था)