कराटे स्पर्धा
By Admin | Updated: February 10, 2015 00:55 IST2015-02-10T00:55:47+5:302015-02-10T00:55:47+5:30
राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे रविवारी आयोजन

कराटे स्पर्धा
र ष्ट्रीय कराटे स्पर्धेचे रविवारी आयोजननागपूर : पहिल्या मोशन चषक राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि.१५) दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावरील सभागृहात होत आहे. या स्पर्धेत विविध राज्यातील ४०० वर खेळाडू सहभागी होतील, अशी माहिती स्पर्धेचे आयोजन सचिव अन्वर अली यांनी एका पत्रकाद्वारे दिली.ट्रॅडिशनल इंटरनॅशनल शोतोकॉन कराटे असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने आणि डॉ. आंबेडकर कॉलेज र्स्पोस् अकादमी दीक्षाभूमी व महावीर एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने स्पर्धेत आयोजन होत आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था आमदार निवास येथे तसेच भोजन व्यवस्था स्पर्धास्थळी आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. विविध वजन प्रकारात दिवसभर सामन्यांचे आयोजन होईल. सायंकाळी पुरस्कार वितरण तसेच बेल्ट वितरण होईल. या स्पर्धेला भेट देण्यासाठी बॉलिवूडचे प्रख्यात कराटे प्रशिक्षक यज्ञेश शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत.रविवारी सकाळी ८ वाजता आ. नागो गाणार आणि सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता समारोप स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, उपप्राचार्य डॉ. अरविंद जोशी, प्रमोद वालमांडरे यांच्या उपस्थितीत होईल, असे अन्वर अली यांनी कळविले आहे.(क्रीडा प्रतिनिधी).....................................................................................