संचालन समितीसाठी कपिल देव यांच्या नावाची शिफारस
By Admin | Updated: July 13, 2017 00:45 IST2017-07-13T00:45:37+5:302017-07-13T00:45:37+5:30
शिफारशीनुरूप खेळाडूंची संघटना तयार करण्यासाठी चार सदस्यांच्या संचालन समितीत कपिल देव यांना घेण्याची शिफारस सीओएने केली आहे

संचालन समितीसाठी कपिल देव यांच्या नावाची शिफारस
नवी दिल्ली : लोढा समितीच्या शिफारशीनुरूप खेळाडूंची संघटना तयार करण्यासाठी चार सदस्यांच्या संचालन समितीत कपिल देव यांना घेण्याची शिफारस सीओएने केली आहे. अन्य सदस्यांमध्ये माजी कसोटी फलंदाज अंशुमन गायकवाड, यष्टिरक्षक भरत रेड्डी आणि गोलकीपर जी. के. पिल्ले यांचा समावेश आहे.
लोढा समितीने सुरुवातीला जी. के. पिल्ले, मोहिंदर अमरनाथ, डायना एडलजी आणि अनिल कुंबळे यांची नावे पुढे केली होती. सीओएने चौथ्या स्टेटस् रिपोर्टमध्ये अमरनाथ आणि कुंबळे यांनी समितीत राहण्यास असमर्थता दर्शविल्याचे म्हटले आहे. डायना सीओए सदस्य असल्याने त्या संचालन समितीत राहू शकणार नाहीत. याशिवाय रामचंद्र गुहा व विक्रम लिमये यांनी सोओएतून अंग काढल्याने अन्य सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा पुढे करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)
।मुख्य कोचसाठी सीएसीचे कौतुक
रवी शास्त्री यांना मुख्य कोच बनविणाऱ्या क्रिकेट सल्लागार समितीच्या निर्णयाचे सीओएने कौतुक केले. सीएसीने कोचसाठी व्यापकहिताचा विचार केला. सचिन, गांगुली आणि लक्ष्मण या महान खेळाडूंच्या समितीकडून अशीच अपेक्षा होती. नवे कोच आणि कर्णधार यांच्यातील समन्वय भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळवून देण्यास प्रेरणादायी ठरेल, अशी आशा सीओएने व्यक्त केली.