पहिली कसोटी : ‘विराट’ खेळी व्यर्थ, भारताचा 48 धावांनी पराभव
अॅडिलेड : पुन्हा एकदा ‘विराट’ प्रदर्शन करीत कर्णधाराने टीम इंडियाला विजयाच्या दारात आणले होते. मात्र, इतर शिलेदारांनी कच खाल्ली अन् कांगारूंनी भारताच्या तोंडचा घास पळविला. भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना त्यांनी अखेरच्या दिवशी अवघ्या 48 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने दुस:या डावातही भारतीय फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावर फिरविले.त्याने 7 बळी घेऊन भारतीय फलंदाजी नेस्तनाबूत केली.
ऑस्ट्रेलियाच्या 364 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणा:या भारतीय संघाची एका वेळी 2 बाद 242 धावा अशी मजबूत स्थिती होती. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी अवघ्या 73 धावांत भारताचे 8 फलंदाज तंबूत पाठवून मालिकेत 1-क् अशी आघाडी घेतली. भारतीय संघ 87.1 षटकांत 315 धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार विराट कोहली (141) व मुरली विजय (99) यांनी मैदानावर टिच्चून फलंदाजी केली. इतर 7 फलंदाज द्विअंकी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. त्याआधी, ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 5 बाद 29क् धावांवर घोषित केला. विराट कोहली कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावांत शतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. याआधी, विजय हजारे यांनी ही कामगिरी केली होती. कोहलीने सामन्यात 175 चेंडूंत 16 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 141 धावांची खेळी केली. हे त्याचे दहावे कसोटी शतक होते. विराटने 131 चेंडूंत हे शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून लियॉनने 152 धावा देऊन 7 बळी घेतले. त्याने सामन्यात एकूण 12 गडी बाद केले. या शानदार कामगिरीच्या बळावर तो ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याआधी, ऑस्ट्रेलियानेपहिला डाव 7 बाद 517 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात, भारताने 444 धावा केल्या होत्या. लियॉनला मिशेल जॉन्सनने दोन, तर रेयान हॅरीसने एक गडी बाद करून चांगली साथ दिली. (वृत्तसंस्था)
धावफलक : ऑस्ट्रेलिया - पहिला डाव 7 बाद 517 धावांवर घोषित; दुसरा डाव : 5 बाद 29क् घोषित; भारत : पहिला डाव : सर्व बाद 444 धावा; भारत दुसरा डाव : मुरली विजय पायचीत गो. लियॉन 99, शिखर धवन ङो. हॅडिन गो. जॉनसन 9, चेतेश्वर पुजारा ङो. हॅडिन गो. लियॉन 21, विराट कोहली ङो. मार्श गो. लियॉन 141, अजिंक्य रहाणो ङो. रॉजर्स गो. लियॉन क्, रोहित शर्मा ङो. वॉर्नर गो. लियॉन 6, वृद्धिमान साहा त्रि. गो. लियॉन 13, कर्ण शर्मा नाबाद 4, मोहंमद शमी ङो. जॉन्सन गो. हॅरिस 5, वरुण अॅरोन पायचीत गो. जॉन्सन 1, ईशांत शर्मा यष्टीचीत (हॅडिन) गो. लिऑन 1; अवांतर : 15; एकूण : 87.1 षटकांत सर्व बाद 315; गोलंदाजी : मिशेल जॉन्सन 16-2-45-2, रॅन हॅरिस 19-6-49-1, नॅथन लियॉन 34.1-5-152-7, पीटर सिडल 9-3-21-क्, शेन वॉटसन 2-क्-6-क्, स्टीव्ह स्मिथ 3-क्-18-क्, मिशेल मार्श 4-1-11-क्.
मी आणि विजय मैदानात असतो, तर निकाल वेगळा असता : कोहली
मुरली विजय हा सामन्याचा ‘टर्निग पॉईंट’ राहिला,असे खुद्द भारतीय कर्णधार विराट कोहलीने कबूल केले. तो म्हणाला, ‘‘मी आणि विजय मैदानात राहिलो असतो, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. आम्ही दोघांनी 4क् धावा अधिक जोडल्या असत्या, तर सामना भारताकडेही वळला असता. एका संधीचा संघ कसा फायदा उठवतो, हे प्रत्येकाने पाहिले. तेच ऑस्ट्रेलियाने दाखवून दिले.’’
वॉर्नर, धवन
व विराट दंड
डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन व विराट कोहली
यांनी आचारसंहितेचा भंग केल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारच्या सत्रत नियम 2.1.8 या नियमाचा भंग केल्यामुळे त्यांना अनुक्रमे 15,3क् व 4क् टक्के मॅच फिजचा दंड केला आहे.