धर्मशाळा : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विराटच्या वाघांनी कांगारूंची शिकार करून मराठी नववर्षाची दमदार सुरुवात केली. स्लेजिंग करून समोरच्या संघाला हैराण करणारा आॅस्ट्रेलियन संघ चौथ्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाच्या जाळ्यात अडकला होता. यानंतर चौथ्या दिवशी भारताने ऐतिहासिक मालिका विजयाची माळ घातली. टीम इंडियाच सरस...: १९९-९७ सालापासून सुरू झालेली बॉर्डर - गावसकर ट्रॉफी मालिका आतापर्यंत एकूण १३ वेळा खेळविण्यात आली. यामध्ये भारताने ७ वेळा बाजी मारली असून, आॅस्टे्रलियाने ५ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर, एकदा ही मालिका बरोबरीत राहिली आहे. जडेजाची तलवारबाजीआक्रमक अष्टपैलू रवींद्र जडेजाची अर्धशतक झळकावून बॅट तलवारीप्रमाणे फिरवण्याची स्टाइल चांगलीच गाजली. त्याने अशाच आक्रमक शैलीप्रमाणे निर्णायक अष्टपैलू खेळ करताना आॅस्टे्रलियाची हवा काढली. टीम इंडियाचे ‘पांडव’चेतेश्वर पुजारा मालिकेत सर्वाधिक धावा केलेला भारतीय फलंदाज.लोकेश राहुल कसोटी सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध करताना मालिकेत ६ अर्धशतके.आर. आश्विन मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज.उमेश यादव मालिकेत १७ बळी घेत सर्वांत यशस्वी वेगवान गोलंदाज.रवींद्र जडेजामालिकेत सर्वाधिक बळी घेत, दोन अर्धशतके झळकावून अष्टपैलू चमक.बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा इतिहास१९९६-९७ भारत (१-०)१९९७-९८भारत (२-१)१९९९-००कांगारू (३-०)२०००-०१भारत (२-१)२००३-०४अनिर्णीत (१-१)२००४-०५कांगारू (२-१)२००७-०८कांगारू (२-१)२००८-०९भारत (२-०)२०१०-११भारत (२-०)२०११-१२ कांगारू (४-०)२०१२-१३भारत (४-०)२०१४-१५ कांगारू (२-०)२०१६-१७भारत (२-१)
कांगारूंची शिकार!
By admin | Updated: March 29, 2017 04:31 IST