कबड्डी : शिवशक्ती, मुंबई पोलीस संघांना जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 08:24 PM2019-12-25T20:24:51+5:302019-12-25T20:25:34+5:30

विजय नवनाथ क्रीडा मंडळाने न्यू परशुराम क्रीडा मंडळाचा प्रतिकार ३३-२२ असा मोडून काढत “स्व. दत्ताजी नलावडे स्मृती चषक” आपल्या नावे केला.

Kabaddi: Shivshakti, Mumbai police teams win | कबड्डी : शिवशक्ती, मुंबई पोलीस संघांना जेतेपद

कबड्डी : शिवशक्ती, मुंबई पोलीस संघांना जेतेपद

googlenewsNext

मुंबई :- विजय नवनाथ क्रीडा मंडळ आणि शिवशक्ती महिला संघ(अ) यांनी मुंबई शहर कबड्डी असो. ने आयोजित केलेल्या आणि मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाने पुरस्कृत केलेल्या “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी” स्पर्धेच्या अनुक्रमे कुमार आणि कुमारी गटाचे जेतेपद पटकाविले. प्रथम श्रेणी व्यसवसायिक पुरुषांत मुंबई पोलीस संघाने, तर व्दितीय श्रेणी व्यावसायिक पुरुषांत टी. बी. एम. स्पोर्ट्सने अजिंक्यपद मिळविले. नायगाव-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमार गटाच्या अंतिम सामन्यात विजय नवनाथ क्रीडा मंडळाने न्यू परशुराम क्रीडा मंडळाचा प्रतिकार ३३-२२ असा मोडून काढत “स्व. दत्ताजी नलावडे स्मृती चषक” आपल्या नावे केला. महाराष्ट्र राज्य-विधान सभेचे अध्यक्ष पद भूषविलेले नलावडे हे विजय नवनाथ ह्या संघाचे खेळाडू होते. त्याच बरोबर ते उत्तम पंच देखील होते. त्यांच्या नावाचा चषक स्वीकारताना नलावडे यांचे चिरंजीव निरंजन नलावडे यांचा ऊर अभिमानाने भरून आला.

   विजय नवनाथने सुरुवातच अशी जोरदार केली की मध्यांतराला २३-०९अशी मोठी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला. उत्तरार्धात सावध व संयमी खेळ करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. हर्ष लाड, दीप बोर्डवेकर, प्रथमेश दहीबावकर यांच्या उत्कृष्ट चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. न्यू परशुराम कडून शुभम धनावडे, भावेश लोदी यांनी उत्तरार्धात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण तो संघाच्या विज्याकरिता पुरेसा नव्हता. कुमारी गटाचा अंतिम सामना शिवशक्तीच्या दोन महिला संघात झाला. त्यात शिवशक्ती- अ ने शिवशक्ती- ब ला १०-०५ असे नमवित “स्व. द्रौपदी मारुती जाधव स्मृती चषक” पटकाविला. प्रतीक्षा तांडेल, साक्षी रहाटे, साधना विश्वकर्मा या विजयात चमकले. शिवशक्ती-ब च्या ज्योती डफळे, प्राची भादवणकर यांचा खेळ आज बहरला नाही.

 व्यावसायिक प्रथम श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई पोलीस संघाने मुंबई पोष्टल संघाला ३१-२९ असे चकवीत “स्व. दुलाजी राणे स्मृती चषक” पटकाविला. विठ्ठल कट्टामणी, लवु गर्जे यांच्या सर्वांगसुंदर खेळाच्या जोरावर पूर्वार्धात १५-१०अशी आघाडी घेणाऱ्या पोलिसांना ही आघाडी टिकविण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला. रोशन परब, श्रीकांत पाटील यांनी उत्तरार्धात जोरदार कमबॅक करीत पोष्टालला विजया समीप आणले होते. पण विजय मात्र ते मिळवून देऊ शकले नाही. व्यावसायिक व्दितीय श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात टी. बी. एम. स्पोर्ट्सने अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवास इंटरप्रायझेसचा २७-२६असा एका गुणांनी पराभव करीत “ स्व. शशिकांत भागवत स्मृती चषकावर” आपले नाव कोरले.  पहिल्या डावात १४-११अशी आघाडी घेणाऱ्या टीबीएमला दुसऱ्या डावात शिवासने कडवी लढत देत सामन्याची चुरस वाढविली. पण अखेरीस १गुणांच्या निसटत्या फरकाने त्यांना हार मानावी लागली. जितेश पाटील, रोहित मोकल टीबीएमकडून, तर आदिनाथ घुले, चांदसाब बागा शिवासकडून उत्तम खेळले.

Web Title: Kabaddi: Shivshakti, Mumbai police teams win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.