ज्वालाची अ‍ॅकॅडमी होणार सुरू

By Admin | Updated: March 12, 2017 03:04 IST2017-03-12T03:04:51+5:302017-03-12T03:04:51+5:30

दिग्गज बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने शनिवारी तिच्या बॅडमिंटन अकॅडमीची घोषणा केली. पुढील महिन्यात सुरू होणारी ही अकॅडमी नॉक आऊट वेलनेस लॅब्स एएलपीच्या साथीने बनवण्यात

Jwala's academy will continue | ज्वालाची अ‍ॅकॅडमी होणार सुरू

ज्वालाची अ‍ॅकॅडमी होणार सुरू

हैदराबाद : दिग्गज बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने शनिवारी तिच्या बॅडमिंटन अकॅडमीची घोषणा केली. पुढील महिन्यात सुरू होणारी ही अकॅडमी नॉक आऊट वेलनेस लॅब्स एएलपीच्या साथीने बनवण्यात आली आहे. या अकॅडमीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक बॅडमिंटन प्रशिक्षणाच्या सुविधा असणार आहेत. जागतिक पातळीवरील स्पर्धेच्या तयारीसाठी खेळाडूंना सर्वोत्तम प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
ज्वाला म्हणाली, ‘‘भारतात बॅडमिंटनचा प्रसार वेगाने होत आहे आणि अनेक युवा खेळाडू याकडे कारकीर्दीच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने पाहत आहेत. आमची अकॅडमी युवा खेळाडूंचा शोध, त्यांच्यातील गुणांना विकसित करण्यास साह्यकारक ठरेल, तसेच त्यांना सर्वोत्तम ट्रेनिंग दिले जाईल.’’ अकॅडमीतील प्रतिभावान खेळाडूंना परदेशात आदान-प्रदान कार्यक्रमांत पाठवले जाईल आणि आपल्या परिसरात राष्ट्रीय शिबिराचे यजमानपदही पत्करेल. या अकॅडमीत एक भारतीय आणि एक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक असेल, तर २0 खेळाडूंच्या गटाला प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रशिक्षक असेल. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Jwala's academy will continue