बबिता फोगाटला 'Terrorist' म्हणणाऱ्यावर भडकली Jwala Gutta; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:31 PM2020-04-18T12:31:08+5:302020-04-18T12:32:11+5:30

ज्वालानं बबिताला ते वादग्रस्त ट्विट डिलीट करण्याची विनंती केली

Jwala Gutta Urges Babita Phogat To Withdraw Controversial Tweet svg | बबिता फोगाटला 'Terrorist' म्हणणाऱ्यावर भडकली Jwala Gutta; म्हणाली...

बबिता फोगाटला 'Terrorist' म्हणणाऱ्यावर भडकली Jwala Gutta; म्हणाली...

googlenewsNext

भारताची कुस्तीपटू बबिता फोगाटनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची बरीच चर्चा सुरू आहे. तिनं तबलिगी जमातवर टीका करताना देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढण्यास ते कारणीभूत असल्याचा आरोप केला. या वक्तव्यानंतर तिच्यावर टीकाही होत आहे, तर अनेक जण तिच्या समर्थनातही उतरले आहेत. या मुद्द्यावर भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं तिचं मत व्यक्त केलं. तिनं या मतात बबिताच्या नावाचा उल्लेखही केला नव्हता, परंतु एका फॉलोअर्सनं तिच्या मतावर रिल्पाय देताना बबिताला 'Terrorist' म्हणून संबोधले. त्यावर ज्वाला भडकली.

बबिता फोगाटची 'तबलिगी जमात' वर वादग्रस्त पोस्ट; महाराष्ट्रात पोलीस तक्रार दाखल

अर्जुन पुरस्कार विजेती ज्वाला म्हणाली,''मला ट्रोल करण्यापूर्वी मी सांगू इच्छिते की मी एक भारतीय आहे. भारतीय म्हणून मी पदक जिंकली आहेत आणि तेव्हा कोणी माझी जात-धर्म पाहीला नाही. माझ्या पदकाचं सेलिब्रेशन प्रत्येक भारतीयांनी केलं. कृपया आपल्या महान देशाचं असं विभाजन करू नका, एकजुटीनं राहा.''


ज्वालाच्या या ट्विटवर फॉलोअर्सनं रिल्पाय दिला. ''तुम्ही देशासाठी पदक जिंकत होता आणि काही लोकांना हेही माहीत नाही की देश काय आहे.'' त्यानं या पोस्टला #babita_fogat_terrorist हा हॅशटॅग वापरला.  

त्यावर ज्वालानं उत्तर दिलं की, तुम्ही वापरलेला हॅशटॅग मला आवडलेला नाही, तो डिलीट करा.''

दरम्यान, ज्वालानं बबिताला ते वादग्रस्त ट्विट डिलीट करण्याची विनंती केली. ''हा व्हायरस कोणताही जात-धर्म पाहत नाही. तुला मी विनंती करते की तुझं ट्विट डिलीट कर. आपण खेळाडू आहोत आणि आपण धर्मनिरपेक्ष देशाचे प्रतिनिधित्व करतो,'' असं ज्वाला म्हणाली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Viral Video : 'शीला की जवानी' वर थिरकला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 

MS Dhoniचा तीन वर्षांचा Future Plan ठरलाय!

 

Web Title: Jwala Gutta Urges Babita Phogat To Withdraw Controversial Tweet svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.