तबलिगी जमातविरोधात बोलणाऱ्या बबितावर ज्वाला भडकली; म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 03:44 PM2020-04-21T15:44:24+5:302020-04-21T15:45:19+5:30

तबलिगी जमातवरील वादग्रस्त विधानामुळे कुस्तीपटू बबिता फोगाट सध्या चर्चेत आहे.

Jwala Gutta criticized on Babita Phogat svg | तबलिगी जमातविरोधात बोलणाऱ्या बबितावर ज्वाला भडकली; म्हणाली... 

तबलिगी जमातविरोधात बोलणाऱ्या बबितावर ज्वाला भडकली; म्हणाली... 

Next

तबलिगी जमातवरील वादग्रस्त विधानामुळे कुस्तीपटू बबिता फोगाट सध्या चर्चेत आहे. तिच्यावर टीकाही होत आहे. बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं प्रतिक्रिया दिली आहे. बबिता फोगाट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे समाजात तेढ निर्माण करत आहे, असं विधान ज्वालानं केलं आहे. एका खेळाडूला असं विधान करायला नको, असंही ती म्हणाली.

2019मध्ये भाजपात प्रवेश करणाऱ्या बबिता फोगाटनं निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाशी संबंधित वादग्रस्त ट्विट केले आहेत. औरंगाबादमध्ये तिच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ट्विटरवर काही युजर्सनी #SuspendedBabitaPhogat अशी मोहीम चालवली आहे. भारतीय खेळाडूंमध्ये केवळ ज्वाला गुट्टानं आवाज उठवला. क्विंट या वेबसाईटशी बोलताना ज्वालानं प्रतिक्रिया दिली.

ती म्हणाली,''मी काही ट्विट्स पाहिली, ज्यावरून मला असं वाटतं की ती एका समाजाला लक्ष्य करत आहे. असं करण्याची ही योग्य वेळ नाही. आपण समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आहोत आणि कोणतंही विधान करण्यापूर्वी आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी. बबिताच्या विधानात ते दिसले नाही. ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या समाजाबद्दल लोकांना भडकवत आहे.''

''लोकांना दोष देऊन किंवा लक्ष्य करून परिस्थिती आणखी बिघडेल. खेळाडू शांतीदूत असतात आणि जगभरात ते वेगवेगळ्या धर्माच्या लोकांशी भेटतात. त्यामुळे एका खेळाडूकडून अशा ट्विट्सची मला अपेक्षा नव्हती,''असेही ज्वाला म्हणाली.

बबिता फोगाट विधानावर ठाम...
बबिता आपल्या विधानावर ठाम आहे. ती म्हणाली,''माझ्या पोस्टनंतर मला धमकी देणारे फोन, मॅसेज येत आहेत. त्यांनी मी सांगू इच्छिते की तुमच्या धमकीला घाबरणारी मी झायरा वसीम नाही. तुमच्या धमकीला मी घाबरणार नाही. देशासाठी मी नेहमी लढत आली आहे आणि यापुढेही लढणार. माझ्या ट्विटमध्ये मी काहीच चुकीचं म्हटलेलं नाही आणि त्या विधानावर मी कायम आहे. तुम्हाला मी विचारते की तबलिगी जमात वाल्यांनी कोरोना संक्रमणला पसरवलं नसतं, तर आतापर्यंत हिंदुस्थानातून कोरोना व्हायरस नष्ट झाला असता. काही लोकांना सत्य कडू लागतं, पण मी सत्य बोलणं सोडणार नाही.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनमध्ये फुटबॉलपटू ड्रोनने पाठवतोय 35 लाख कंडोम; कोरोना लढ्यात असाही हातभार

चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला धक्का; 'Hotness' मध्ये 20 वर्षीय अभिनेत्रीनं टाकलं मागे

फुटबॉल विश्वाला धक्का; सामन्यासाठी सराव करताना 22 वर्षीय खेळाडूचा मृत्यु

10-11 वर्षांपूर्वीच दिलेला सल्ला, आता जगाला पटतंय महत्त्व; शोएब अख्तरचा दावा

भारतीय क्रिकेटपटूचे वडील करतायत रुग्णांची सेवा 

Video : DJ ब्राव्होनं तयार केलं महेंद्रसिंग धोनीवर खास गाण; पाहा झलक

Web Title: Jwala Gutta criticized on Babita Phogat svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.