ज्युनियर गट फुटबॉल
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:01+5:302015-02-16T21:12:01+5:30
ज्युनियर गट फुटबॉल

ज्युनियर गट फुटबॉल
ज युनियर गट फुटबॉलनागपूर सिटी अजिंक्यनागपूर : प्रारंभी माघारल्यानंतरही मुसंडी मारणाऱ्या नागपूर सिटी क्लबने अंतिम सामन्यात ओएनएफसीचा ४-१ ने पराभव करीत सोमवारी एनडीएफए ज्युनियर गट फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला. नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेने पोलीस लाईन टाकळी मैदानावर सामन्यांचे आयोजन केले होते.सामन्यात पूर्वार्धातील खेळावर ओएनएफसीचे वर्चस्व होते. उत्तरार्धात नागपूर सिटी संघाने मुसंडी मारून २४ मिनिटांच्या खेळात चार गोल करीत विजय खेचून आणला. त्याआधी सामना सुरू होताच १३ व्या मिनिटाला आसिफ अन्सारी याने ओएनएफसीचा पहिला गोल केला. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिल्यानंतर खेळ सुरू होताच ६५ व्या मिनिटाला उस्मान अन्सारीने बरोबरी साधणारा गोल नोंदविला. ७२ व्या मिनिटाला सुमित गावंडे याने नागपूर सिटीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ८२ व्या मिनिटाला पुन्हा अन्सारीने आणि सामना संपायला काही सेकंदांचा खेळ शिल्लक असताना श्रीकांत गेटमे याने चौथा गोल केला. उद्या दि. १७ ला मोतीबाग मैदानावर सिनियर डिव्हिजन स्पर्धेचा अंतिम सामना ताज स्पोर्टिंग आणि नागपूर सिटी क्लब यांच्यात दुपारी ३ वाजेपासून खेळविण्यात येणार आहे.(क्रीडा प्रतिनिधी)