ज्युनियर सेहवागही झाला माहीचा फॅन

By Admin | Updated: January 25, 2017 15:47 IST2017-01-25T15:43:33+5:302017-01-25T15:47:53+5:30

तर सेहवागचा मोठा मुलगा आर्यवीर सेहवागही माहीची फॅन झाला

Juniar became the fan of Mahi Fan | ज्युनियर सेहवागही झाला माहीचा फॅन

ज्युनियर सेहवागही झाला माहीचा फॅन

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 -  इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या महेंद्र सिंग धोनीची त्याचा एकवेळचा संघ सहकारी वीरेंद्र सेहवागने सामन्याचे समालोचन करताना मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. आता तर सेहवागचा मोठा  मुलगा आर्यवीर सेहवागही माहीची फॅन झाला आहे. आर्यवीरने तुफान फटकेबाजी करणाऱ्या धोनीचे फलंदाजी करतानाचे चित्र रेखाटले आहे. 
वीरूने आपल्या मुलग्याने काढलेले चित्र ट्विटरवर अपलोड केले आहे. "माझा मोठा मुलगा आर्यवीरने रेखाटलेले माहीचे चित्र.  या चित्रात पण माही फटकेबाजी करतोय, असे वीरूने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  वीरूचे  हे ट्विट क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरले आहे. 

Web Title: Juniar became the fan of Mahi Fan