शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Swapnil Kusale: आजी हरखली, आई गदगदली... कांबळवाडीकरांचा गुरुवारचा दिवस स्वप्नवत ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 13:13 IST

स्वप्नील मायदेशी परतल्यानंतर कोल्हापूरपासून कांबळवाडी गावापर्यंत स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक काढणार 

बाजीराव फराकटेशिरगाव : ना मोबाइलला नेटवर्क, ना माणसांचा वेशीबाहेरचा वावर.. सारा काही व्यवहार आडवळणाच्या दुर्गम भागातच.. पण, गुरुवारचा दिवस त्यांच्यासाठी स्वप्नवत ठरला. ज्यांची नावं केवळ टीव्हीवर ऐकायचो त्या मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांचे मोबाइल थेट कांबळवाडीतील (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) रेंज शोधू लागल्याने उभा गाव हरखून गेला. ही किमया ज्या कुसाळे परिवारातील पोरामुळे घडली त्या नातवाच्या पराक्रमाने हरखून गेलेली आजी, कष्टाचे पांग फेडल्याने गदगदलेले आई-वडील अन् टीचभर गावाचे नाव जगभर केल्याने आनंदून गेलेला गाव असे उत्साही चित्र गुरुवारी कांबळवाडीकरांनी अनुभवले.स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातल्यानंतर त्याचे कुटुंब आनंदात न्हाऊन निघाले. सकाळपासून आई अनिता, वडील सुरेश, आजोबा महादेव, आजी तुळसाबाई, लहान भाऊ सूरज, चुलते शिक्षक शिवाजी, चुलती मनीषा व भावंडे टीव्हीसमोर बसून होते. क्षणाक्षणाला त्यांची उत्कंठा वाढत होती. तो जिंकेल हा विश्वास असला तरी खेळ खेळ असतो, याची जाणीवही त्यांना होती. दुपारी स्वप्नीलने कांस्यपदकाला गवसणी घातल्यानंतर सारे कुटुंब भरपावसात आनंदाने चिंब झाले.एकमेकांना त्यांनी कडकडून मिठी मारल्या. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले. मुलासाठी घेतलेले कष्ट अन् त्याने कांस्यपदक मिळवून केलेली उतराई या भावनेने आई अनिता यांना गदगदून आले. आजी तर पुरती हरखून गेली. वडील सुरेश यांच्या आनंदाला भरते आले. काय करू आणि काय नको अशीच काहीशी त्यांची स्थिती झाली होती.

खणाणले मोबाइलस्वप्नीलने कांस्यपदक मिळवल्यानंतर त्याच्या घरातील मोबाइल खणाणू लागले. देशभरातून त्याच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षावर करण्यात आला. विशेष म्हणजे आई-वडिलांचे अभिनंदन करण्यासाठी जिल्ह्यातील मान्यवरांच्या रांगा कांबळवाडीत लागल्या.मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मोबाइलवरून फोन करून सुरेश कुसाळे यांचे अभिनंदन केले. भविष्यात लागेल ती मदत शासनाच्या वतीने दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. लवकरच त्याचा सन्मान केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनीही सुरेश कुसाळे यांचे अभिनंदन केले. लवकरच कांबळवाडी गावात येऊन भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही अभिनंदन करत कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर नेल्याचा अभिमान असल्याचे सांगितले.

स्वप्नील याने पदक जिंकून दिल्यावर गावात जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आताषबाजी, गुलालाची उधळण व ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत अनेकांनी कुसाळे कुटुंबीयांचे अभिनंदन केले.

स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूकस्वप्नील मायदेशी परतल्यानंतर कोल्हापूरपासून कांबळवाडी गावापर्यंत स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचे वडील सुरेश कुसाळे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Shootingगोळीबारswapnil kusaleस्वप्नील कुसाळे