जुआन जुनिगाला ठार मारण्याची धमकी
By Admin | Updated: July 6, 2014 01:30 IST2014-07-06T01:30:10+5:302014-07-06T01:30:10+5:30
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज, शनिवारी झालेल्या सामन्यात ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारला कोलंबियाच्या जुआन जुनिगामुळे दुखापत झाली.

जुआन जुनिगाला ठार मारण्याची धमकी
साओ पाऊलो : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज, शनिवारी झालेल्या सामन्यात ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारला कोलंबियाच्या जुआन जुनिगामुळे दुखापत झाली. यामुळे निराश झालेल्या ब्राझीलच्या प्रशंकांनी जुआनला ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर त्याच्यावर वर्णभेदी टीकाही करण्यात आली आहे.
जुआनच्या टि¦टर अकाउंटवर या घटनेबद्दल त्यालाच जबाबदार धरण्यात आले असून, त्याला मारण्याच्या धमक्यांचा पाऊस पडला आहे. जुआनचा उल्लेख ‘मॉन्स्टर’ आणि ‘फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा खलनायक’ अशा शब्दांत करण्यात आला आहे.
नेमारला दुखापत करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असे जुआनने स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘मी जेव्हा मैदानात असतो, तेव्हा कोणालाही दुखापत न करता माङया देशासाठी जे काही करता येईल, ते करण्यासाठी माझी धडपड असते. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता.
आम्ही खेळाडूंना टॅकल करत होतो. मी काही नेमारचा कणा मोडण्याचे आव्हान स्वीकारलेले नव्हते. मी फक्त माङया देशाचा बचाव करत होतो. त्याला झालेली दुखापत खरेच वाईट गोष्ट आहे. मात्र, देवाच्या कृपेने ही दुखापत खूप गंभीर नसावी. कारण सर्वाना माहीत आहे, तो खूूपच गुणवान खेळाडू आहे.’ (वृत्तसंस्था)