जर्मनीत जल्लोष
By Admin | Updated: June 17, 2014 05:08 IST2014-06-17T05:08:17+5:302014-06-17T05:08:17+5:30
जर्मनीच्या जोरापुढे पोर्तुगालचा संघ धुळधाण उडाली. जर्मनीने पोर्तुगाल संघाला ४-० च्या फरकाने हरवले.

जर्मनीत जल्लोष
ऑनलाइन टिम
साल्वाडोर, दि. १७ - जर्मनीच्या जोरापुढे पोर्तुगालचा संघ धुळधाण उडाली. जर्मनीने पोर्तुगाल संघाला ४-० च्या फरकाने हरवले. अतिशय नियोजनबद्ध रणनिती असल्याने खेळाच्या पहिल्याच भागात जर्मनीचा खेळाडू थॉमस म्युलर याने १२ व्या मिनिटाला गोल करत पोर्तुगाल संघ आणि प्रेक्षक यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यानंतर मेट्स ह्यूमेलने हेडर मारत गोल केल्यावर जर्मन प्रेक्षकांच्या जोशाला उधाण आले आणि पोर्तिगीज संघावरचे दडपण वाढले. जर्मन खेळाडूंचेच पाय बॉल घेऊन सर्वाधिककाळ मैदानावर थिरकत होते. पोर्तुगीज संघात योग्य तो समन्वय नसल्याने रोनाल्डो अस्वस्थ झाला होता. दुस-याच गोल नंतर पोर्तुगाल संघाच्या पेपे ने म्युलर सोबत केलेल्या शाब्दिक चकमकीमुळे त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले आणि तीन सामन्यांकरता त्यावर बंदी आली. या घटनेने पोर्तुगीज संघाचे खच्चीकरण झाले नसते तरच नवल. झाल्या प्रकारामुळे आग पाखड नकरता थॉमस म्युलरने तिसरा गोल करत आपला जबाब नोंदवला. सरते शेवटी पोर्तुगालला एकही गोल करण्याची संधी न देता जर्मनीने सामना सहज जिंकला.