‘जोको’ला अव्वल मानांकन

By Admin | Updated: June 19, 2014 03:21 IST2014-06-19T03:21:11+5:302014-06-19T03:21:11+5:30

जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील खेळाडू स्पेनचा राफेल नदाल याच्याऐवजी सर्बियाचा नोवाक जोकोविच याला २३ जूनपासून सुरू होत

'Joko' top ranking | ‘जोको’ला अव्वल मानांकन

‘जोको’ला अव्वल मानांकन

लंडन : जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील खेळाडू स्पेनचा राफेल नदाल याच्याऐवजी सर्बियाचा नोवाक जोकोविच याला २३ जूनपासून सुरू होत असलेल्या विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष गटात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. महिला गटात हा मान अव्वल स्थानावर असलेली अमेरिकेची सेरेना विलियम्स हिला देण्यात आला.
गतविजेता अ‍ॅण्डी मरे याला सातवेळचा चॅम्पियन रॉजर फेडरर याच्यापेक्षा तीन स्थानांनी पुढे ठेवण्यात आले. आॅल इंग्लंड कोर्टवरील वादग्रस्त ग्रासकोर्ट क्रमवारीच्या आधारे २०११ आणि २०१३ चा चॅम्पियन जोकोविच याला अव्वल स्थान मिळाले. २००८ आणि २०१० चा विजेता, राफेल नदाल याला दुसरे मानांकन मिळाले. गेल्या सात फायनलमध्ये जोकोविचला नमवून १९३६ नंतर जेतेपद पटकावणारा पहिला ब्रिटिश खेळाडू बनलेल्या मरे याला तिसरे मानांकन देण्यात आले. २०१२ साली सातवे विम्बल्डन जेतेपद पटकवल्यानंतर २०१३ साली दुसऱ्याच फेरीत बाद झालेला फेडरर
हा मानांकनात चौथ्या स्थानावर
आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Joko' top ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.