जोहोरचा भारत ‘सुलतान’

By Admin | Updated: October 20, 2014 05:01 IST2014-10-20T04:34:26+5:302014-10-20T05:01:14+5:30

पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट हरमनप्रीत सिंगने अखेरच्या क्षणाला नोंदविलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर भारताने ग्रेट ब्रिटनचा २-१ने पराभव केला आणि सुलतान जोहोर कप ज्युनिअर हॉकी स्पर्धेत जेतेपद कायम राखले.

Johor's India 'Sultan' | जोहोरचा भारत ‘सुलतान’

जोहोरचा भारत ‘सुलतान’

जोहोर बाहरू : पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट हरमनप्रीत सिंगने अखेरच्या क्षणाला नोंदविलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर भारताने ग्रेट ब्रिटनचा २-१ने पराभव केला आणि सुलतान जोहोर कप ज्युनिअर हॉकी स्पर्धेत जेतेपद कायम राखले.
अंतिम लढतीत मध्यांतरापर्यंत गोलफलक कोराच होता. हरमनप्रीतने दुसऱ्या हाफमध्ये चमकदार कामगिरी केली. उभय संघ १-१ने बरोबरीत असताना, हरमनप्रीतने अखेरच्या क्षणी पेनल्टी कॉर्नरवर वैयक्तिक दुसरा गोल नोंदवीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी, हरमनप्रीतने ४५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत भारताला आघाडी मिळवून दिली होती. ब्रिटनतर्फे ५३व्या मिनिटाला सॅम्युअल फ्रेंचने बरोबरी साधणारा गोल नोंदविला. फ्रेंचने पेनल्टी कॉर्नरवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. हरमनप्रीत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला.

Web Title: Johor's India 'Sultan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.