जॉनच्या संघाचे नाव ‘नॉर्थ ईस्ट युनायटेड’
By Admin | Updated: June 11, 2014 02:51 IST2014-06-11T02:51:57+5:302014-06-11T02:51:57+5:30
बॉलीवूड स्टार जॉन अब्राहम याने इंडियन सुपर लीगमधील आपल्या गुवाहटी संघाचे नाव जाहीर केले आहे. ‘नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी’ असे या संघाचे नाव असेल.

जॉनच्या संघाचे नाव ‘नॉर्थ ईस्ट युनायटेड’
>गुवहाटी : बॉलीवूड स्टार जॉन अब्राहम याने इंडियन सुपर लीगमधील आपल्या गुवाहटी संघाचे नाव जाहीर केले आहे. ‘नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी’ असे या संघाचे नाव असेल. या नावासाठी जॉनने चार प्रतिष्ठित संघांशी चर्चा केल्याचे समजते. या नावाच्या घोषणोदरम्यान जॉनने स्पध्रेत धमाकेदार कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
तो म्हणाला, मी नेहमीच फुटबॉलचा चाहता आहे आणि उत्तर पूर्व भारताविषयी मला आस्था आहे. त्यामुळेच आम्ही गुवाहटी संघ विकत घेण्याचे ठरवले. तसे झाले नसते तर आम्ही या स्पध्रेत उतरलोच नसतो. या संघाला नाव देताना पूर्ण आठ राज्यांचा समावेश असावा, असा आमचा हेतू होता. गुवाहटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जॉनने या स्पध्रेत एक निखळ फुटबॉल संघ म्हणून ओळख बनविण्यासाठी प्रय}शील असल्याचे सांगितले.
या संघात विदेशी क्लबचा सहभाग आहे का, असे त्याला विचारे असता तो म्हणाला, अनेक विदेशी क्लबनी सह संघमालक बनण्याची इच्छा प्रकट केली होती, परंतु आम्हाला आमचा सहभाग कमी करून घ्यायचा नव्हता. धोरणात्मक भागीदारी करण्यात आम्हाला रस आहे. यासाठी आम्ही चार विदेशी क्लबशी चर्चा करीत आहोत. येत्या काही आठवडय़ांत त्यांची घोषणा आम्ही करू. पहिल्यांचा आम्ही संघाच्या जर्सीच्या रंगाची घोषणा करणार ंआहोत. (वृत्तसंस्था)
ब्राझील बाजी मारणार
फिफा वल्र्डकपमध्ये ब्राझील बाजी मारेल, असे जॉनला वाटते. त्यापाठोपाठ अर्जेटिनाला कौल असून, त्याने लिओनेल मेस्सी स्पध्रेत धमाकेदार कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केली. जर्मनीचा संघ तरुणांचा असल्याचे तो म्हणाला.