जॉन ब्रुक्सचा निर्णायक गोल

By Admin | Updated: June 18, 2014 05:43 IST2014-06-18T05:43:17+5:302014-06-18T05:43:17+5:30

दली खेळाडू जॉन ब्रुक्स याने ८६व्या मिनिटाला नोंदविलेल्या निर्णायक गोलमुळे अमेरिकेने घानाचा फिफा विश्वचषकात जी गटाच्या सामन्यात सोमवारी २-१ ने पराभव केला

John Brooks's decisive goal | जॉन ब्रुक्सचा निर्णायक गोल

जॉन ब्रुक्सचा निर्णायक गोल

नटाल : बदली खेळाडू जॉन ब्रुक्स याने ८६व्या मिनिटाला नोंदविलेल्या निर्णायक गोलमुळे अमेरिकेने घानाचा फिफा विश्वचषकात जी गटाच्या सामन्यात सोमवारी २-१ ने पराभव केला.
गेल्या दोन विश्वचषकांत घानाकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अमेरिकेचे प्रशंसक आसुसले होते. ‘ब्लॅक स्टार्स’ घानाने गेल्या विश्वचषकात तर अमेरिकेला पराभूत करून बाहेरचा रस्तादेखील दाखविला होता. खेळ सुरू होताच अर्ध्या मिनिटात अमेरिकेचा मिडफिल्डर क्लिंट डेमसे याने रोहमर्षक, पण आश्चर्यचकित करणारा गोल नोंदवून आघाडी घेतली. ८२व्या मिनिटाला घानाने बरोबरी साधली. ४ वर्षांपूर्वी गोल नोंदवून अमेरिकेला बाहेर ढकलणारा असाओमा ग्यान याने एडीच्या पासवर हा गोल केला. चार मिनिटांचा खेळ होत नाही तोच २० वर्षांच्या ब्रुक्सने ग्रॅहम ज्युुसी याच्या पासवर गोल करून अमेरिकेला पुन्हा आघाडी मिळवून दिली. अमेरिकेच्या ८४ वर्षांच्या इतिहासातील विश्वचषकाच्या ३० सामन्यांत बदली खेळाडूने नोंदविलेला हा पहिला गोल होता.
बचावफळीतील ब्रुक्स गोल नोंदविताच इतका आनंदी झाला, की मैदानावर चक्क झोपला. सहकाऱ्यांनी हलविल्यानंतरही तो उठला नाही.
अमेरिकेचा संघ मैदानात जल्लोष करीत होता, तर प्रेक्षकांमध्ये यूएस ए..., यूएस ए... अशा घोषणा दिल्या जात होत्या. अमेरिकेचे कोच जर्गेन क्लिन्समन म्हणाले, ‘‘हा सामना फायनलसारखा होता.’’ याच सामन्यात स्ट्रायकर जोजी एल्टिडोर जखमी झाला. त्याला पुढील सामना खेळण्याआधी फिटनेस चाचणीतून जावे लागेल. त्याआधी पूर्वार्धातील खेळात अमेरिकेचा कर्णधार डेम्पसेच्या चेहऱ्यावर जॉन बोयेची किक आदळताच त्याच्या नाकातून रक्त बाहेर आले. पण, लगेचच तो मैदानात आला, तरी श्वास घेण्यास त्याला त्रास जाणवत होता. मॅट बेसलर उत्तरार्धातील खेळात मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे मैदानावर जाताच ब्रुक्सने बदली खेळाडू म्हणून त्याची जागा घेतली व अमेरिकेला विजय मिळवून दिला.(वृत्तसंस्था)

Web Title: John Brooks's decisive goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.