जितू विजयपथावर, वर्ल्डकप नेमबाजीत रौप्य
By Admin | Updated: October 7, 2016 02:45 IST2016-10-07T02:45:41+5:302016-10-07T02:45:41+5:30
देशातील नंबर वन पिस्टल नेमबाज जितू राय याने रिओ आॅलिम्पिकमधील आपले अपयश मागे टाकताना इटलीच्या बोलोग्ना येथे सुरू असलेल्या नेमबाजी वर्ल्डकपमध्ये आपल्या

जितू विजयपथावर, वर्ल्डकप नेमबाजीत रौप्य
नवी दिल्ली : देशातील नंबर वन पिस्टल नेमबाज जितू राय याने रिओ आॅलिम्पिकमधील आपले अपयश मागे टाकताना इटलीच्या बोलोग्ना येथे सुरू असलेल्या नेमबाजी वर्ल्डकपमध्ये आपल्या सर्वांत आवडत्या ५० मीटर पिस्टल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावरील जितूने त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपल्या जोरदार कामगिरीचे संकेत दिले आहेत. जितू रिओतील शानदार कामगिरीनंतरही पदकापासून वंचित राहिला होता व त्याला आठव्या स्थानावर राहावे लागले होते.
तथापि, या अपयशानंतर जितूने जोरदार मुसंडी मारताना ५६८ गुणांसह क्वॉलिफाइंग फेरीत दुसरे स्थान मिळवले, तर आठ नेमबाजांच्या फायनलमध्ये तो चीनच्या वेई पांग याच्यापेक्षा खूप कमी अंतराच्या फरकाने मागे राहिला व त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जितूला आपल्या चौथ्या आणि पाचव्या खराब मालिकेचे नुकसान सहन करावे लागले. फायनलमध्ये जितूचा एकूण स्कोर १८८.८ राहिला, तर वेई पांग याचा १९0.६ राहिला. (वृत्तसंस्था)
उल्लेखनीय बाब म्हणजे या स्पर्धेत जगातील अव्वल १0 नेमबाज सहभागी झाले आहेत.