जीतू रायला सुवर्ण, तर अमनप्रीतला रौप्य
By Admin | Updated: March 1, 2017 17:36 IST2017-03-01T17:36:04+5:302017-03-01T17:36:04+5:30
भारताचा अव्वल नेमबाजपटू जीतू राय याने अचूक लक्ष साधून आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात

जीतू रायला सुवर्ण, तर अमनप्रीतला रौप्य
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 01 - भारताचा अव्वल नेमबाजपटू जीतू राय याने अचूक लक्ष साधून आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात २३०.१ गुण संपादन करून सुवर्णवेध घेतला.
या स्पर्धेत जीतूचे हे दुसरे पदक आहे. मंगळवारी त्याने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. याच प्रकारात भारताच्या अमनप्रीतने २२६.९ गुणांसह रौप्यपदक जिंकले.