जेनिफर का है ये जलवा..!

By Admin | Updated: June 12, 2014 04:47 IST2014-06-12T04:47:53+5:302014-06-12T04:47:53+5:30

हॉलीवूडची प्रसिद्ध पॉप स्टार गायिका जेनिफर लोपेझ गुरुवारी होणाऱ्या फुटबॉल महासंग्रामाच्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या अदाकारीने चाहत्यांना बेधुंद करणार आहे.

Jennifer's aqua ..! | जेनिफर का है ये जलवा..!

जेनिफर का है ये जलवा..!

साओ पाउलो : हॉलीवूडची प्रसिद्ध पॉप स्टार गायिका जेनिफर लोपेझ गुरुवारी होणाऱ्या फुटबॉल महासंग्रामाच्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या अदाकारीने चाहत्यांना बेधुंद करणार आहे.
या सोहळ्यात ती प्रदर्शन करणार नाही, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अखेर तिच्या प्रतिनिधीने बुधवारी ‘पीपल मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले की, लोपेझ उद्घाटन सोहळ्यात आपला जलवा दाखवणार.
लोपेझची प्रतिनिधी म्हणाली की, जेनिफर ही नेहमी विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्याचा भाग बनण्यास उत्सुक होती. आम्ही कार्यक्रमास अंतिम रूप देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ती कार्यक्रमास सहभागी होणार नाही, हे वृत्त देण्यात घाई केली गेली. जेनिफर आपल्या चाहत्यांना तसेच फुटबॉलप्रेमींना कधीच नाराज करणार नाही. ती तिथे नक्की असणार.
उद्घाटन सोहळ्यात जेनिफर विश्वचषकाचे ‘वूई आर वन’हे ‘थिम सॉँग’ ही सादर करेल. या गीतासाठी सात विविध गीतकारांची मदत घेण्यात आली आहे. एवढेच नव्हे, या गीतात प्रसिद्ध गायक पीटबूल आणि ब्राझिलियर पॉप स्टार क्लाउडिया लिटे यांचाही आवाज घुमणार आहे. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकाचे शकिरा हिने गायिलेले ‘वाका वाका’ हे गीत जगभरात प्रसिद्ध झाले होते. ‘वूई आर वन’ हे गीतही त्याच तोडीचे असेल, असा विश्वास आयोजकांना आहे. दरम्यान, ६० हजारांहून अधिक लोक साओ पाउलोच्या कोरिंथिएस एरिनामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास, तसेच ब्राझील-क्रोएशिया हा शुभारंभीचा सामना पाहण्यासाठी गर्दी करतील. (वृत्तसंस्था)
तसेच टीव्हीद्वारे जगभरातील १०० कोटींहून अधिक लोक या कार्यक्रमाचा आनंद लुटतील. सोहळ्यात २५ मिनिटांचा विशेष शो ब्राझील संस्कृतीला समर्पित केला आहे.

Web Title: Jennifer's aqua ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.