जयसुर्याची सेक्स टेप लिक
By Admin | Updated: May 30, 2017 17:27 IST2017-05-30T00:05:26+5:302017-05-30T17:27:18+5:30
श्रीलंका टीमचा माजी कर्णधार धडाकेबाज फलंदाज सनथ जयसुर्या वादात अडकला आहे.

जयसुर्याची सेक्स टेप लिक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसुर्याचे क्रिकेट करिअर यशस्वी राहीले असले तरी वैयक्तिक आयुष्य मात्र वादग्रस्त राहिले. जयसुर्याच्या घटस्फोटीत तिसऱ्या पत्नीने त्याच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. जयसुर्याने आपल्यासोबतचा तो एमएमएस मुद्दाम व्हायरल केल्याचा आरोप त्याच्या तिसऱ्या पत्नीने केलाय. या आरोपामुळे श्रीलंका टीमचा माजी कर्णधार धडाकेबाज फलंदाज सनथ जयसुर्या वादात अडकला आहे. जयसुर्यावर त्या महिलेने रिवेंज पॉर्न चा आरोप ठेवला आहे.
इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, या टेपमध्ये असलेल्या महिलेने जयसुर्यावर टेप लीक केल्याचा आरोप केला आहे. ही टेप खूप जुना आहे, जयसुर्याने जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्यासाठी ही टेप व्हायरल केला असल्याचे या महिलेने सांगितले. अद्याप जयसुर्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. एकेवेळी जयसुर्याची गर्लफ्रेंड असलेली ही महिला सध्या एका प्रतिष्ठीत व्यापाऱ्याची पत्नी आहे.