जयश्री, मंदार यांची सलग चौथ्या दिवशी सुवर्ण कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 02:15 IST2017-08-13T02:15:56+5:302017-08-13T02:15:56+5:30
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत मूळचा कोल्हापूरचा; पण सीमा सुरक्षा दलात अधिकारी असलेला जलतरणपटू मंदार दिवसे व कोल्हापूर पोेलीस दलाची धावपटू जयश्री बोरगी यांनी सलग चौथ्या दिवशीही आपली घोडदौड कायम

जयश्री, मंदार यांची सलग चौथ्या दिवशी सुवर्ण कामगिरी
कोल्हापूर : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत मूळचा कोल्हापूरचा; पण सीमा सुरक्षा दलात अधिकारी असलेला जलतरणपटू मंदार दिवसे व कोल्हापूर पोेलीस दलाची धावपटू जयश्री बोरगी यांनी सलग चौथ्या दिवशीही आपली घोडदौड कायम राखत शनिवारी मध्यरात्री प्रत्येकी आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली. मंदारने या स्पर्धेत २०० मीटर फ्रीस्टाईल, दोन मैल पोहणे, ४००, ८०० मीटर फ्रीस्टाईल आणि १५०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये अशी पाच सुवर्ण, तर २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात, ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल रिले, मिश्र मिडले अशी दोन रौप्य, तीन कांस्य व पाच सुवर्ण अशा एकूण दहा पदकांची कमाई केली; तर जयश्रीने चार सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशी सात पदके मिळविली. दोघांच्या कामगिरीमुळे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहे.