जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा
By Admin | Updated: December 13, 2014 14:48 IST2014-12-12T23:49:20+5:302014-12-13T14:48:21+5:30
अंजुमन स्कूलने जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी नागपूर माध्यमिक स्कूलचा ६-० ने धुव्वा उडवित एकतर्फी विजयाची नोंद केली.

जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा
जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा
अंजुमन स्कूलचा एकतर्फी विजय
नागपूर : अंजुमन स्कूलने जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी नागपूर माध्यमिक स्कूलचा ६-० ने धुव्वा उडवित एकतर्फी विजयाची नोंद केली. एनडीएफएद्वारे आयोजित या स्पर्धेतील सामने मध्य रेल्वेच्या अजनी मैदानावर खेळविण्यात येत आहेत. लोकमत मीडिया प्रा. लिमिटेड हे पुरस्कर्ते आहेत.
विजयी घोडदौड कायम राखणाऱ्या अंजुमन संघाने आजही प्रारंभीपासून वर्चस्व गाजविले. चौथ्या मिनिटाला मोहम्मद इकराम याने खाते उघडले. झियाऊर रहमानने पुढच्या क्षणाला आघाडी दुप्पट केली. अंजुमनचा तिसरा गोल शेख फरदीन याने १४ व्या मिनिटाला नोंदविला.मध्यंतरापर्यंत विजयी संघाकडे ३-० अशी आघाडी होती.
मध्यंतरातील खेळात आणखी तीन गोल झाले. ३५ व्या मिनिटाला शेख शाहीद याने तर पुढच्या क्षणाला मो. इकरामने गोल केला. ४५ व्या मिनिटाला अनिस अन्सारी याने संघाचा सहावा गोल नोंदविला.
हुसामिया हायस्कूलने के. जॉन पब्लिक स्कूलला पुढे चाल दिली. अन्य एका सामन्यात सेंट ॲन्नेस स्कूलने गुरुनानक स्कूलचा १-० ने पराभव केला. दानिश अंजनकर याने १२ व्या मिनिटाला नोंदविलेला गोल निर्णायक ठरला.
सेंट जोन्स हायस्कूलने प्रहार विद्यालयाला ५-० ने लोळविले. आबिद शेख याने ११ व्या, रुपेश आत्राम १२, दिव्यांशू, ३१ व्या, मोहित अग्रवाल ३५ व्या आणि पृथ्वी मानकर याने ३६ व्या मिनिटाला गोल केला.
उद्या शनिवारी सकाळी ८ पासून एसएफएसविरुद्ध सेंटर पॉईंट स्कूल वर्धमाननगर, सेंट मायकेल हायस्कूलविरुद्ध सीपीएस दाभा, एमएम रब्बानी हायस्कूल कामठीविरुद्ध गुरुनानक स्कूल, सेंट जॉन्स स्कूलविरुद्ध राजेंद्र हायस्कूल आणि भवन्स श्रीकृष्ण नगरविरुद्ध राजेंद्र हायस्कूल हे सामने खेळविले जातील.(क्रीडा प्रतिनिधी)