जवाहरलाल दर्डा शालेय फुटबॉल
By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:24+5:302014-12-18T22:39:24+5:30
जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा

जवाहरलाल दर्डा शालेय फुटबॉल
ज ाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धाअंजुमन, सेंट जॉन्स उपांत्य फेरीतनागपूर : अंजुमन हायस्कूल आणि सेंट जॉन्स स्कूल संघांनी गुरुवारी जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेच्या अजनी मैदानावर या सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून लोकमत मीडिया प्रा. लिमिटेड हे पुरस्कर्ते आहेत.अंजुमनने भवन्स श्रीकृष्ण नगर संघावर १-० ने सरशी साधली. सामन्यात निर्णायक ठरलेला गोल मोहम्मद इकराम याने पाचव्या मिनिटाला नोंदविला. सामन्यात नियमबाह्य खेळ केल्याबद्दल रेफ्रीने इकरामला ६६ व्या मिनिटाला तंबी दिली.भवन्सचे जयेश धवल आणि अखिलेश शेळके यांनाही ताकीद देण्यात आली.सेंट जॉन्सने टायब्रेकरपर्यंत लांबलेल्या अटीतटीच्या लढतीत सेंटर पॉईंट स्कूल दाभाला ४-२ ने नमविले. सामन्यात निर्धारित वेळेत गोलसंख्या ३-३ अशी बरोबरीत होती. रुपेश आत्रामने २६ तसेच आदिब शेख याने ५८ आणि ७५ व्या मिनिटाला सेंट जॉन्सकडून तर रोनित राठी याने सीपीएससाठी तिन्ही गोल चौथ्या, १२ व्या आणि २८ व्या मिनिटाला केले होते. पेनल्टी शूटआऊटमध्ये हाशिम रझा , रुपेश आत्राम, हर्षिल अख्तर आणि साहिल मेश्राम यांनी सेंट जॉन्सकडून गोल केले. सीपीएसकडून कौस्तुभ गोडे आणि रोनित राठी यांनाच गोल नोंदविण्यात यश आले. कुणाल पेठेच्या चार गोलमुळे के. जॉन संघाने राजेंद्र हायस्कूलचा ५-० ने एकतर्फी पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पेठेने चौथ्या, १३ व्या, १७ व्या आणि ४४ व्या मिनिटाला संधी शोधली. गौरव बागडे याने ४५ व्या मिनिटाला एक गोल केला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून एमएम रब्बानी हायस्कूल विरुद्ध के. जॉन स्कूल आणि एसएफएसविरुद्ध मॉन्टफोर्ट स्कूल यांच्यात सामने होतील.......................................... कॉलेज लीग फुटबॉल ५ जानेवारीपासूनजवाहरलाल दर्डा स्मृती आंतर महाविद्यालयीन फुटबॉल सामन्यांना ५ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. इच्छूक कॉलेज संघांनी एनडीएफए कार्यालयातून अर्ज प्राप्त करावेत. अधिक माहितीसाठी एनडीएफए सचिव युजीन नॉबर्ट यांचेशी संपर्क करावा, असे आयोजकांनी कळविले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)................