जपानचा स्वित्झर्लंडवर विजय
By Admin | Updated: June 10, 2015 01:21 IST2015-06-10T01:21:38+5:302015-06-10T01:21:38+5:30
कर्णधार माया मियामा हिने पहिल्या हाफमध्ये पेनल्टी कॉर्नरवर नोंदवलेल्या गोलच्या बळावर गत विजेत्या जपानने स्वित्झर्लंडचा पराभव केला.

जपानचा स्वित्झर्लंडवर विजय
वैकूवर : कर्णधार माया मियामा हिने पहिल्या हाफमध्ये पेनल्टी कॉर्नरवर नोंदवलेल्या गोलच्या बळावर गत विजेत्या जपानने स्वित्झर्लंडचा पराभव केला. याबरोबरच त्यांनी महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. जपानला २९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. या संधीचा मियामा हिने पुरेपर फायदा उठवला. तिचा हा १५० सामना आहे. तर तिचा हा ३७ वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. जपानची लढत आता कॅमरूनविरुद्ध होणार आहे. ज्यांनी ‘क’ गटात इक्वादोरचा ६-० ने पराभव केला होता.
‘ड’ गटात माजी विजेत्या अमेरिकेने आॅस्ट्रेलियाचा पराभव केला. आता त्यांचा सामना नायजेरियाविरुद्ध होईल. आफ्रिकन चॅम्पियन नायझेरियाने याच गटात स्वीडनविरुद्ध ३-३ अशी बरोबरी साधली. (वृत्तसंस्था)