जपानची अंतिम फेरीत धडक

By Admin | Updated: July 3, 2015 04:24 IST2015-07-03T04:24:33+5:302015-07-03T04:24:33+5:30

विद्यमान विश्वविजेते जपानने जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने भक्कम आगेकूच करताना इग्लंडचे कडवे आव्हान २-१ असे परतावून लावत फिफा महिला विश्वचषक

Japan beats in the final round | जपानची अंतिम फेरीत धडक

जपानची अंतिम फेरीत धडक

एडमंटन : विद्यमान विश्वविजेते जपानने जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने भक्कम आगेकूच करताना इग्लंडचे कडवे आव्हान २-१ असे परतावून लावत फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. रविवारी विजेतेपदासाठी जपानचा सामना बलाढ्य अमेरिकेविरुद्ध होईल.
कॉमनवेल्थ स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी तोडिस तोड खेळ करताना सामना चुरशीचा केला. जपानने अनेकदा गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र इग्लंडच्या भक्कम बचावापुढे निभाव न लागल्याने त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यातच इगलंडने देखील आक्रमक पवित्रा घेताना सामन्यात रंग भरले.
यावेळी ३३व्या मिनिटाला जपानची कप्तान अया मियामा हिने अप्रतिम गोल करताना संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर लगेच सात मिनिटांनंतर इग्लंडने देखील बरोबरी साधताना शानादार पुनरागमन केले. फारा विलियम्सने पेनल्टी कॉर्नरची संधी साधताना गोल केला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला.
मध्यंतराला सामना
बरोबरीत राहिल्यानंतर दोन्ही संघांनी सावध भूमिका घेताना धोका शक्यतो टाळला. निर्धारीत वेळेत १-१ अशी बरोबरी कायम राहिल्यानंतर घेण्यात आलेल्या अतिरीक्त वेळेमध्ये नेमका घोळ झाला.
अतिरीक्त वेळेच्या दुसऱ्याच मिनिटाला इग्लंडची बचावपटू लाउरा बासेट हिने ९०+२ मिनिटाला स्वयंगोल करताना जपानच्या विजयात हातभार लावला. या एका चुकीमुळे पहिल्यांदा विश्वचषक अंतिम फेरी गाठण्याचे इंग्लंडचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. तर जपानने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठल्याचा जल्लोष केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Japan beats in the final round