जम्बोने केला धोनीचा बचाव, टीकाकारांना खडसावले

By Admin | Updated: October 19, 2016 18:52 IST2016-10-19T18:39:48+5:302016-10-19T18:52:25+5:30

माध्यमात टिका-टिपण्णी सुरू असताना या सगळ्यावर भारतीय संघाचे कोच अनिल कुंबळे यांनी धोनीच्या या निर्णयाची पाठराखण केली आहे. तसेच त्याने टीकाकारांला खडसावले देखिल.

The jambon has defended Dhoni, criticized the commentators | जम्बोने केला धोनीचा बचाव, टीकाकारांना खडसावले

जम्बोने केला धोनीचा बचाव, टीकाकारांना खडसावले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - एकदिवसीय संघाचा कर्णधार धोनीने फलंदाजी करण्यासाठी कोणत्या क्रमांकावर यावे? यावर क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहेत. धोनी सातव्या क्रमांकाऐवजी सध्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. त्याचा हा निर्णय योग्य की अयोग्य यावर खेळ तज्ञांमध्ये चर्चा, माध्यमात टीका-टिपण्णी सुरू असताना या सगळ्यावर भारतीय संघाचे कोच अनिल कुंबळे यांनी धोनीच्या या निर्णयाची पाठराखण केली आहे. तसेच त्यांनी टीकाकारांला खडसावले देखील. 
 
अनिल कुंबळे माध्यमांशी बोलताना म्हणाले,  धोनीला धावपट्टीवर स्थिरावण्यास कमी वेळ लागतो. त्याला यासाठी आवश्यक तो अनुभव आहे. त्यामुळे त्याला धावपट्टीवर अधिक काळ घालविण्याची गरज नाही. धोनी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो त्यासाठी त्याला क्रिकेटचा खुप मोठा अनुभव आहे. 
 
पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी धोनीला वरच्या क्रमांकावर खेळायला पाठविले पाहिजे का? या प्रश्नावर बोलताना कुंबळे म्हणाला की, हे सर्व मॅचच्या परिस्थितीवर अवलंबून असते. धावसंख्येचा पाठलाग करताना अनुभवाची गरज असते. जोपर्यंत धोनीचा प्रश्न आहे, त्याकडे खूप अनुभव आहे. त्याने अनेक वर्षांपासून स्वतःला सिद्ध केले आहे. एक फलंदाज म्हणून त्याच्याकडे कोणत्याही क्रमांकावरी फलंदाजी करण्याची क्षमता आहे.
 

 

Web Title: The jambon has defended Dhoni, criticized the commentators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.